ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा कल दिसतो. दरम्यान या निवडणुकांतून निवडून येणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांना किती पगार असतो?तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल जाणून घेऊया. 

2021 मध्ये राज्य शासनाने सरपंच आणि उपसंरपंचांच्या मानधन, मोबदल्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार गावाची लोकसंख्या विचारात घेतली जाते. सरपंचा हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. निवडणुकीद्वारे त्याला 5 वर्षांसाठी निवडले जाते. सरपंचाला मुखिया, प्रधान, ग्रामसभा अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. पण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. 

सरपंचाचा पगार गावातील लोकसंख्येनुसार ठरतो. सर्वांचा पगार कमी किंवा जास्त असू शकतो. जेवढी गावाची लोकसंख्या जास्त तेवढा सरपंचाचा पगार जास्त असतो. सरपंचाला कमीत कमी 2500 ते 3000 तर जास्तीत जास्त 5 हजारपर्यंत पगार दिला जातो. ज्या गावची लोकसंख्या शून्य ते 2000 असेल त्या गावच्या सरपंचाचे मानधन प्रति महिना 3 हजार रुपये इतके असते. त्या गावच्या उपसरपंचाला 1 हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते.  यासोबतच त्यांना सरकारी अनुदानाची 75 टक्के रक्कम मिळते. सरपंचाला 2 हजार 250 रुपये तर उपसरपंचाला 750 रुपये अनुदानाची रक्कम मिळते. 

हेही वाचा :  'कांतारा' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

8 हजार लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचाला 5 हजार मानधन दिले  तर 3 हजार 750 इतके सरकारी अनुदान मिळते.  तर उपसरपंचाला 2 हजार इतके मानधन आणि 1500 इतके अनुदान दिले जाते. यापूर्वी सरपंचाला 4 हजार तर उपसरपंचाला 2 हजार इतके मानधन दिले जायचे. सरपंच आणि उपसंरपंच यांचा पगार राज्य शासनाकडून थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जातो. यामध्ये त्यांचे मानधन आणि बैठक भत्ता यांचा समावेश असतो.

राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …