2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Elections : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका गेले तीन वर्षे रखडल्या असल्या तरी आज 2353 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. या निवडणुकीचा सोमवारी निकाल लागणार आहे.

23 हजार जागांसाठी आज मतदान

राज्यातील 2353 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 20,572 जागा आहेत. या सर्व 2353 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय 2068 ग्रामपंचायतींमधील रिक्त 2950 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. रिक्त असलेल्या 130 सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे 23 हजार जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानासाठी सुरुवात होणआर आहे.

सोलापुरात मतदानासाठी सुरुवात

सोलापूर जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतींपैकी 101 ग्रामपंचायत साठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील 483 मतदान केंद्रावर 2 लाख 64 हजार 706 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 121 ग्रामपंचायत सदस्य आणि 8 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. आज 956 सदस्य आणि 101 सरपंच जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मध्ये 26, अक्कलकोट 18, करमाळा 15, माढा 14, माळशिरस 9, दक्षिण सोलापूर 9, बार्शी 5 , सांगोला 4, पंढरपूर 2, मोहोळ 2, सोलापूर जिल्ह्यात 483 मतदान केंद्र असून त्यापैकी 74 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे. सोबत या ठिकाणी सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. जेणे करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. 6 नोव्हेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी मत मोजणी होणार आहे. 

हेही वाचा :  रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?

हिंसाचाराच्या घटनेनंतर बीडमध्ये 158 ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान

बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींसाठी आज, रविवारी सकाळी 7:30 ते संध्या 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी संवेदनशील बूथवर तगडा पोलिस बंदोबस्त दिला आहे. यात 1600 अधिकारी, कर्माचारी आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये 158 ग्रामपंचायती निवडणुकीसाठी 531 उमेदवार, तर 3 हजार 236 सदस्य रिंगणामध्ये आहेत. यासाठी 2 लाख 86 हजार 409 मतदार असून 561 मतदान केंद्रे आहेत. 186 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात बिनविरोध 11 तर 16 ग्रामपंचायतमध्ये मतदानावर बहिष्कार आहे.

बीड जिल्हयातील 158 ग्रामपंचायतसाठी आज प्रत्यक्ष मतदान तालुका निहाय आकडेवारी

1) बीड-10

2) माजलगाव – 31

3) धारुर -17

4) वडवणी -8

5) केज-23

6)अंबेजोगाई-4

7) परळी-3

8) पाटोदा-12

9) गेवराई-33

10) आष्टी-2

11) शिरुर -15



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …