वयाच्या 30 आधीच खायला घ्या हे Vitamins व Mineral, नाहीतर येईल अंथरूणात खिळण्याची वेळ

Health Tips on International Women’s Day : बाल्यावस्थेपासून तरूणावस्थेपर्यंत प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या भूमिका निभावते. तर या संपूर्ण प्रवासात तिला आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक होऊन बसते. शरीराची योग्य काळजी घ्यायची तर शरीराला पोषण मिळणे सुद्धा महत्त्वाचे असते. पण अनेकदा अनेक स्त्रियांकडून हीच चुक होते आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर शारीरिक पोषणाकडे लक्ष न दिल्याने त्यांना पुढे जाऊन मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा तर केवळ याच कारणामुळे कित्येक स्त्रियांना गंभीर आजार झाल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत.

म्हणूनच Multivitamins आणि Supplements च्या माध्यमातून पोषक तत्व शरीराला देणे गरजेचे आहे. ब्लॅकमोर्सचे कंट्री मॅनेजर पुनीत सूद यांच्या मते, महिलांसाठी संतुलित आहारासोबतच काही जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप महत्त्वाची असतात. पण ही तत्वे डाएट-फूडमध्ये फारच कमी प्रमाणात आढळतात, त्यामुळे रोजच्या आहारात त्याकडे दुर्लक्ष होण्याची भीती अधिक असते. म्हणूनच, स्त्रिया शरीरात त्यांची लेव्हल कायम रराहावी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मल्टीविटामिन्स आणि सप्लिमेंट्स घेणे सुरू करू शकतात. (फोटो सौजन्य :- iStock)

लोह

लोह

शरीरातील अनेक कार्यांसाठी लोह आवश्यक आहे. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होऊ शकते आणि अशक्तपणा होऊ शकतो. प्राण्यांचे यकृत, मांस आणि हिरव्या पालेभाज्या तसेच इतर अन्न स्त्रोतांमध्ये भरपूर लोह असते, परंतु ज्या स्त्रियांना आधीच रक्तक्षय आहे किंवा गर्भधारणा होत आहे त्यांच्यासाठी या पोषक तत्वांचे सप्लीमेंट्स घेणे आवश्यक ठरू शकते.
(वाचा :- सुष्मिता सेनच्या नसांमध्ये 95% ब्लॉकेज, Artery Blockage दाखवते ही 8 भयंकर लक्षणं, बंद नसा उघडण्यासाठी 10 उपाय)​

हेही वाचा :  माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरिकेत गेली आणि आयुष्यात आलं एक विचित्र वळण, घ्यावा लागला भारतात परतण्याचा निर्णय..!

कॅल्शियम

कॅल्शियम

कॅल्शियम हे हाडे आणि दातांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करते. महिलांमध्ये वाढत्या वयातही मजबूत हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. एका तरुणीने दिवसातून 2 ग्लास दूध पिणे आवश्यक आहे, पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही. कॅल्शियम सप्लिमेंटची एक टॅब्लेट शरीराला आवश्यक असलेले 500 मिलीग्राम कॅल्शियम पुरवते.
(वाचा :- Hepatitis B Symptoms भणक लागू न देता हेपेटायटिस बी करतं Liver कायमचं फेल, चुकूनही करू नका ही लक्षणं दुर्लक्षित)​

व्हिटॅमिन डी 3

-3

ज्या महिलांना पुरेसे व्हिटॅमिन डी 3 मिळत नाही त्यांना कॅप्सूल स्वरूपात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन D3 मजबूत रोगप्रतिकार प्रणाली राखण्यासाठ मदत करते शिवाय, हाडे आणि स्नायूंची ताकद आणि कॅल्शियम वापरण्यासाठी ते आवश्यक आहे. परंतु पुरेसा सूर्यप्रकाश असूनही त्याची कमतरता भारतीयांमध्ये दिसून येते, आहारातून व्हिटॅमिन डी 3 ची पूर्तता न होणे हे यामागचे प्रमुख कारण आहे. पण ही कमतरता व्हिटॅमिन डी 3 सप्लिमेंटने भरून काढता येते.

(वाचा :- रक्ताच्या गाठी फोडून घट्ट रक्त पातळ करते ही घरगुती साधीसोपी चटणी, हृदयाचे आजार असूनही कधीच येत नाही हार्ट अटॅक)​

हेही वाचा :  पुण्यातील ऑटोरिक्षा चालकाची खास ऑफर, ‘The Kerala Story’ चित्रपट पाहणाऱ्या महिलांना...

काळे तीळ

काळे तीळ

काळ्या तिळांचे तेल खूप फायदेशीर आहे आणि ओमेगा फॅटी ऍसिडचा नैसर्गिक स्रोत आहे. हे तेल मुख्यत: पचन सुधारण्यासाठी, खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. स्किन ब्रेकआउटवर उपाय म्हणून ते त्वचेवर देखील लावले जाते. या तेलाचे फायदे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सप्लिमेंट होय. कारण सप्लिमेंटमध्ये कलोंजी तेलामध्ये आढळणाऱ्या थायमोक्विनोन आणि ओमेगा फॅटी ऍसिडचे प्रमाण विशेष प्रमाणात वाढवले जाते.
(वाचा :- Sprouted Chana: मोड आलेल्या चण्यांत असतं भरपूर प्रोटिन, झटक्यात होतं पोट साफ व मुळव्याध पळतो 10 हात दूर,रोज खा)​

फिश ऑईल

फिश ऑईल

ज्या प्रौढ महिला दर आठवड्याला खोल समुद्रातील मासे खाऊ शकत नाहीत किंवा शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हे एक आवश्यक सप्लिमेंट आहे. हृदय, मेंदू, डोळा, मज्जासंस्था आणि त्वचेच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 ची मदत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे शारीरिक विकास आणि आरोग्य चांगले राहते. शरीराला पुरेश्या ;प्रमाणात ओमेगा -3 फॅटी ऍसिड देण्यासाठी फिश ऑइल सप्लिमेंट घेण्याची शिफारस केली जाते.
(वाचा :- सिंहासनामुळे बोबडं बोलणं होईल बंदच, मोत्यासारखे टपाटप येतील शब्द बाहेर, 5 मिनिटांत मिळेल सिंहासारखा करारा आवाज)​

हेही वाचा :  पहिल्याच भेटीत झाले लिपलॉक करिअरही सोडलं पण झाला घटस्फोट, अमृता-सैफची अधुरी कहाणी

फोलेट

फोलेट

हे वॉटर सॉल्यूबल बी जीवनसत्व नवीन पेशी आणि टिश्यूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. हे पोषक तत्व लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि मेंदूच्या कार्यास देखील मदत करते. हे घेतल्यामुळे गर्भातील बाळामध्ये उद्भवणारी न्यूरल ट्यूबची समस्या टाळता येते. म्हणून, महिलांनी दररोज 400 mcg फोलेट घेणे आवश्यक मानले जाते, जे प्रमाण गर्भधारणेदरम्यान वाढते.
(वाचा :- Mental Health Tips : स्ट्रेसमध्ये असाल तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ, नाहीतर मेंदूची होईल भयंकर अवस्था..!)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …