Tag Archives: Marathi News

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या ‘सगेसोयरे’ शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र आता या अध्यादेशावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही तरतूद आधीपासूनच होती असे …

Read More »

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला …

Read More »

व्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Padma Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली आणि के. चिरंजीवी, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि …

Read More »

शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना शहराध्यक्षाच्या हत्येने खळबळ उडाली होती. शिवा वझरकर नावाच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक केली आहे. शिवा वझरकरच्या हत्यनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला …

Read More »

Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.  काझिरंगा …

Read More »

‘तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्यातल्या राजकारण गेल्या काही महिन्यांपासून ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर टीका सुरु आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एका त्यांना लक्ष्य केले आहे. जुन्नरमध्ये बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत भाष्य केलं आहे.अजित पवारांनी पक्ष सोडून …

Read More »

‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ची सफर

Musafiraa movie Jhilmil song : ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता ‘मुसाफिरा’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे नाव असून हे बहारदार गाणं सलीम मर्चंट यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणं चित्रित करण्यात …

Read More »

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! ‘या’ कंपनीची ऑफर

Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 …

Read More »

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, ‘तुमचं तुम्ही बघा..’

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. …

Read More »

उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या  श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 …

Read More »

नव्याकोऱ्या थारमधून बीटेक पाणीपुरीवाली खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, ‘आमच्या गाड्या…’

BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात ‘बीटेक पाणीपुरी वाली’ महिंद्रा थारवर आपला स्टॉल …

Read More »

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : इथं मराठा आरक्षणाची मागणी उचलून धरत शासनापुढं प्रत्यक्ष आपली मागणी मांडण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि त्यांच्या समर्थनार्थ या आंदोलनात सहभागी झालेले लाखो (Maratha Community) मराठा समाजबांधव सध्या मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. तर, तिथे मराठा समाजाच्या खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास राज्यभरात सुरुवात झाली आहे. पण, सर्वेक्षणाच्या या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवातच काहीशी धीम्या गतीनं झाली असून, …

Read More »

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा …

Read More »

कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी …

Read More »

नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024: दहावी, बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. चांगले पद आणि नोकरी मिळवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  नवी मुंबई …

Read More »

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आता करवाईचा बडगा उभारला जाणार आहे.उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 468 धर्मादाय रूग्णालयांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या …

Read More »

रामललाचा जन्मदिन मिळावा म्हणून रुग्णालयात थांबल्या डिलीव्हरी; पुढे जे घडले ते ऐकून वाटेल आश्चर्य!

Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या.  आपल्या होणाऱ्या बाळाचा …

Read More »

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation Pune traffic changes : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु केलं असून, तिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. जरांगे आणि त्यांच्यासमवेत असणारं हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं असतानाच सध्या ही लाखोंची गर्दी पुणे जिल्ह्याच्या असून, जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला लाखोंचा जनसमुदाय सकाळपासूनच महागणपतीच्या दर्शनासाठी लोटला आहे. इथून पुण्यातून …

Read More »

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation Latest Update  : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनं आणि उपोषणं सुरु आहेत. (Manoj Jarange) मनोज जरांने यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. याच आरक्षणाच्या सातत्यपूर्ण मागणीवर शासनानं तोडगा काढण्यासाठी म्हणून काही महत्त्वाच्या तरतूदी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण …

Read More »

‘…तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल’; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणा आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील 20 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. मनोज जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, …

Read More »