Tag Archives: Marathi News

पेपर देऊन बाहेर पडताच संपवलं आयुष्य; लातूरच्या मुलाने कोटामध्ये उचललं टोकाचं पाऊल

Shocking News : राजस्थानमधील (Rajasthan) कोटा (Kota) येथे रविवारी नीटची (NEET) तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटना अवघ्या चार तासांत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यावर्षी कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये लातूरमधील (Latur) एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. …

Read More »

‘…तरी अनेक अडचणी’; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सभा पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही बीडमध्ये सभा पार पडली आहे. बीडमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसह धनंजय मुंडे यांनीही जोरदार फटकेबाजी केली आहे. दरम्यान या …

Read More »

तुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय

Ganeshotsav 2023 Konkan Railway Special Trains : जुलै महिना ओलांडल्यानंतर गणेशोत्सवाची चाहूल लागते आणि जसजसा दिवस पुढे जातो तसतशी ही उत्सुकता वाढतच जाते. अनेकांनाच गावाचे आणि त्यातूनही कोकणाकडे जाण्याचे वेध लागतात. अशा या गणेशोत्सवाची धूम यंदाही पाहायला मिळत आहे. अनेकांची लगबग सुरु झाली आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. नोकरदार वर्गानं कार्यालयांमध्ये आर …

Read More »

आदित्य एल 1 मिशन किती दिवसांचे? किती येणार खर्च? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Aditya L1 Mission: चांद्रयान 3 मिशनच्या उत्तूंग यशानंतर आता आदित्य एल 1 मिशनबद्दल देशवासियांना उत्सुकता लागली आहे. चंद्रानंतर भारताची इस्रो आता सुर्याच्या जवळ जाण्याचा करिश्मा करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे. दरम्यान या मिशनला आदित्ययन, सूर्ययान आणि सुराज्यन अशी नावे का दिली गेली नाहीत किंवा आपण या नावांनी …

Read More »

‘भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण…’, इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..

ISRO Chief S Somanath: चांद्रयान 3 च्या यशानंतर जगभरात इस्रोचे कौतुक होत आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रो आता सुर्याजवळ जाण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी महत्वाचे विधान केले आहे.चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर चंद्राचे निरीक्षण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने अनेक मोठमोठ्या हालचाली केल्या आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा …

Read More »

नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, ‘मुख्यमंत्रीच…’

Nanded Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. यासाठी ते आता नांदेडमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान नांदेडमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागतासाठी नांदेड विमानतळावर 21 जेसीबी आणले होते. पण हे हे जेसीबी त्यांना परत पाठवावे लागले.  नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली …

Read More »

Viral Video: हा मुलगा खूपच ‘हुशार’, फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते.  मुलांनी जास्त …

Read More »

पुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Rate on 27 August 2023 : देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या 468 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल झाला होता.तेव्हापासून देशात इंधनाचे भाव कमी झाले नाहीत किंवा वाढले नाहीत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली ‘ही’ अपडेट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी पाहिजे तसा पाऊस पाहायला मिळत नाही. त्यामुळे पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.  दुसरीकडे राज्यात मागील 2 ते 3 दिवसात पाऊस पडल्याचे दिसून …

Read More »

‘मजदूरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली’

Fatehpur Viral Story: मजदूरी करुन पत्नीला शिकवले, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला चांगली नोकरीही लागली. पण त्यानंतर मजुराच्या आयुष्याला वेगळे वळण आले. नोकरी मिळाल्यानंतर बायको दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा आरोप मजुराने केला आहे. यूपीच्या फतेहपूरमधून ही घटना समोर आली आहे. सीताशरण पांडे असे या तरुणाचे नाव आहे. सीताशरणने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे. पत्नीला मजूर म्हणून शिक्षण दिले आणि पत्नीला ग्रामपंचायतमध्ये मिशन …

Read More »

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.  नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली …

Read More »

‘माझ्यासोबत आली नाहीस तर…’ पुण्यात ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

Pune Crime: मुंबई- पुणे सारख्या शहरांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्सची संख्या मोठी आहे. या नात्याच्या समाजातील मान्यत्येविषयी अजून अस्पष्टता असल्याने यातील पीडितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.  पुण्यात राहणाऱ्या तरुणीने आपल्या …

Read More »

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MRVC Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जात आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, मुलाखतीची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता (Project …

Read More »

कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : निरक्षरांची (Illiterate) संख्या निश्चित करण्यासाठी आता राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम (saksharta abhiyan) राबवला जाणार आहे. 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या अभियानात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरू असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून सर्व शिक्षक या अभियानात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत …

Read More »

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर

NAFED Banner: नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय. नाशिक जिल्हात नाफेडनं कांदा खरेदी करण्याबाबतच्या अटी आणि शर्तींचं बॅनरच लावलंय. यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची  शक्यता आहे.  नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा …

Read More »

चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे ‘असे’ योगदान

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: नागपुरकरांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी एक बातमी समोर येत आहे. सध्या जगभरात आपल्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे कौतुक सुरु आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या टीममध्ये एका नागपुरकरांचा समावेश राहिला आहे. त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच अंतराळ शास्त्रज्ञ (space sciense) होण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि एक तप म्हणजेच12 वर्षानंतर तो चंद्रयान 3 मोहिमेत इस्त्रोच्या टीममध्ये शास्त्रज्ञ होता. चांद्रयान …

Read More »

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Position of Ajit Pawar in NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. …

Read More »

Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल ‘इतके’ दिवस सुट्ट्या

Bank Holiday 2023: सप्टेंबर महिना सुरु व्हायला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पुढच्या महिना महत्वाचे सण घेऊन येत आहे. अशावेळी सरकारी कार्यालयांसोबत बॅंकांनाही सुट्टी असेल. दैनंदिन बॅंकासंदर्भातील कामे करण्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागते. यासाठी नेमक्या किती सुट्ट्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा …

Read More »

पुण्यात पैशांसाठी पत्नीला रस्त्यावर उभे करुन वेश्याव्यवसाय, 2 मित्रांनाही बनवले ग्राहक

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नावेळी सात फेरे घेताना पती पत्नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण पुण्यातील एका नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीचा उपयोग वैश्या व्यवसायासाठी केल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील हडपसर येथून ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे.  पीडित महिला ही तिच्या पती सोबत उंड्री …

Read More »

आई की कैदासिण? मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर: आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना संभाजीनगरहुन समोर आली आहे. येथे घडलेल्या एका घटनेत मुलगी साखरझोपेत असताना आईनेच तिच्या गोधडीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. एखादी आई असं कसं करु शकते असे प्रश्न? सर्वांना पडला आहे. पण यानंतर एक धक्कादायक कारण समोर आले आहे.  पिडीत तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिने आपल्या …

Read More »