‘भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण…’, इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..

ISRO Chief S Somanath: चांद्रयान 3 च्या यशानंतर जगभरात इस्रोचे कौतुक होत आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रो आता सुर्याजवळ जाण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी महत्वाचे विधान केले आहे.चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर चंद्राचे निरीक्षण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने अनेक मोठमोठ्या हालचाली केल्या आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवेल, असे इस्रो प्रमुख म्हणाले. आपला देश खूप शक्तिशाली आहे. देशातील तरुणांनी अभ्यास करून देशासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

गेल्या 10 वर्षांत इस्रोने साधारण 300 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लोकप्रिय असण्यासोबतच PSLV ला मागणी आहे. तसेच  ASSLV देखील व्यावसायिक प्रक्षेपणासाठी विकसित केले गेले असल्याची माहिती झी न्यूजला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या विशेष मुलाखतीत सोमनाथ यांनी दिली. इस्रोची टीम सूर्य मिशन, गगनयान आणि शुक्रयानवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढील मार्श मोहिमेसाठीही काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र ग्रहावर प्रवास करण्याची पुरेशी क्षमता आहे. परंतु आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची गरज  असल्याचे इस्रो प्रमुख म्हणाले. 

हेही वाचा :  'लडकी चाहीये?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...

यासोबतच अवकाश क्षेत्रासाठी आणखी काही गुंतवणुकीची गरज असल्याचे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले. अवकाश क्षेत्राचा विकास वेगवान व्हायला हवा आणि ही गोष्ट संपूर्ण देशाच्या विकासाशीही निगडीत आहे. हे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आम्हाला दिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत, असेही ते म्हणाले.

इस्रोकडून चांद्रयान-3 मिशनचे अपडेट 

‘चांद्रयान-3 मोहिमेच्या उद्दिष्टांपैकी एक असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग हे पूर्ण झाले आहे. चंद्रावर रोव्हर हलवण्याचे उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. आता इन सिटू वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. सर्व पेलोड सामान्यपणे कार्यरत आहेत. यापूर्वी इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉइंटवर फिरताना दिसत आहे. त्यामुळे मिशनच्या दृष्टीने शनिवार विशेष ठरला आहे.

शनिवारी पंतप्रधान इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तेथील चांद्रयान-3 टीममध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. भारताचे चांद्रयान-3 जिथे उतरले त्या ठिकाणाचे नावही त्यांनी शिवशक्ती पॉइंट असे ठेवले. मिशनच्या यशाबद्दल देशवासियांसोबतच त्यांनी शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. भारताच्या अवकाशातील शक्ती बनण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

हेही वाचा :  Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …