Viral Video: हा मुलगा खूपच ‘हुशार’, फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते. 

मुलांनी जास्त फोन वापरल्यास त्याचा मानसिक विकास आणि डोळ्यांवर परिणाम होतो. आणि यामुळेच पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागते. मुलांना फोनपासून दूर ठेवावे लागते. पण आजची मुलंही कमी नाहीत. तो नेहमी त्याच्या पालकांच्या 2 पावले पुढे असतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे. 

मुलांने आईला दिला चकमा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक लहान मूल अभ्यासासाठी बसलेले दिसत आहे. पण ते मूल पुस्तक वाचतंय असं तुम्हाला वाटेल. पण ते तसं काहीच करत नाहीय. उलट  पुस्तक समोर ठेवून मोबाईल पाहतोय. त्यावर त्याने दोरीने मोबाईल बांधून ठेवलाय. त्याचे सारे लक्ष मोबाईलमध्ये आहे. त्याने फोन दोरीने अशा प्रकारे बांधलेले आहे की दरवाजा उघडताच मोबाईल वरच्या कपड्याच्या मागे लपतो. 

हेही वाचा :  पाचगणीमध्ये 'धुळी वावटळ'; निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा Video Viral | 'Dust storm' in Pachgani; Video Viral showing the nature of nature

मुलगा अभ्यास करतो की नाही हे पाहण्यासाठी त्याची आई रुममध्ये आली. तिने रुमचा दरवाजा उघडताच मोबाईल वर कापडामागे गेला. आणि आईला पाहून मुलगा वाचण्याचे नाटक करु लागला. मुलगा अभ्यास करतोय हे पाहून आई देखील आनंदीत झाली. तिने मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मुलाला शाबासकी दिली आहे. 

व्हिडिओला 3.7M व्ह्यू 

हा व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Figen नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 
कॅप्शनमध्ये मुलाला स्मार्ट म्हटले आहे. हे लिहित असताना हा व्हिडिओ 3 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. आणि 60 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. मुलाची हुशारी पाहिल्यानंतर लोकांनी कमेंटमध्ये त्याचे खूप कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले – स्मार्ट मुलगा.  बेटा, खूप अभ्यास कर, असे  दुसऱ्या युजरने लिहिले आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …