बाजारात येतीये नवी कोरी 7-सीटर कार; Maruti उडवणार Toyoa, Mahindra ची झोप; जाणून घ्या किंमत आणि बुकिंग डिटेल्स

Maruti Suzuki ने आपल्या नव्या 7-सीटर कारचा खुलासा केला आहे. या कारला Maruti Invicto नावाने बाजाराच लाँच केलं जाणार आहे. कंपनीने नुकताच या कारचा एक टिझरही लाँच केला होता. यामध्ये कारचा लूक, डिझाइन, बॉडी यांची माहिती देण्यात आली होती. सुरुवातीला मीडिया रिपोर्टमध्ये, या कारला Maruti Engage नाव देण्यात आलं होतं. पण आता कंपनीने आपल्या या प्रीमियम एमपीव्हीचं नाव स्पष्ट केलं आहे. ही कार टोयोटाची प्रसिद्ध एमपीव्ही Innova Hycross वर आधारित आहे. ही मारुतीच्या पोर्टफोलियोमधील सर्वात महागडी कार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जूनपासून Maruti Invicto च्या बुकिंगला सुरुवात होणार आहे आणि 5 जुलैला विक्रीसाठी लाँच केली जाणार आहे. त्याचवेळी कंपनी कारच्या किंमतीचा खुलासा कऱणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी या कारची किंमत 20 लाखांपर्यंत ठेवू शकते. 

मारुतीची ही आगामी एमपीव्ही Innova Hycross वर आधारित असेल. याआधीही अनेक मॉडेल्समधे हे पाहण्यात आलं आहे. कंपनीने टोयोटा हायराइडवर आधारित ग्रँड विटाराला सादर केलं होतं. इनोव्हा हायक्रॉसच्या तुलनेत Invicto च्या बाहेरील डिझाइनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. दरम्यान, कारचा आकार मात्र सारखीच असेल. यामध्ये नवे फ्रंट गिल पाहण्यास मिळू शकतात. 

हेही वाचा :  Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या

कशी असेल Maruti Invicto 

Maruti Invicto एमपीव्ही केवळ 2.0 लीटर पेट्रोल इंजिनसह हायब्रीड मोटारसह उपलब्ध असेल. हे इंजिन 172bhp ची पॉवर आणि 188Nm चा टार्क जनरेट करते. तर इलेक्ट्रिक मीटर अतिरिक्त 206Nm चा टार्क जनरेट करतं. या इंजिनला e-CVT ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडलं जाणार आहे. 

या कारमध्ये नेमके कोणते फिचर्स असतील याचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. मात्र यामध्ये काही खास फिचर्स असतील असं सांगितलं जात आहे. जसं की, 360 डिग्री कॅमेरा, ADAS, पॅनरमिक सनरुफ, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम आणि मेमरी फंक्शनसह ऑटोमॅटिक ड्रायव्हर सीट सहभागी होण्याची शक्यता आहे. 

मारुतीने आधी सांगितलं होतं की, Maruti Invicto एक लो-वॉल्यून प्रोडक्ट असेल, जे कार्बन फ्रेंडली हायब्रीड तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करेल. याशिवाय इनोव्ह हायक्रॉसचा वेटिंग पीरिअड फार मोठा असताना टोयोटा मारुतीसाठी इनोव्हा युनिट्सचं वाटप कसं करत हे पाहावं लागणार आहे. कारण इनोव्हा हायक्रॉस आणि Invicto ला एकाच असेंबली लाइनवर तयार केलं जाणार आहे. दरम्यान, टोयाटोने आपला ऑर्डर बॅकलॉग भरुन काढण्यासाठी नुकतंच तिसरी शिफ्टही सुरु केली आहे. 

हेही वाचा :  काश्मीर प्रकरणी केलेलं ट्वीट भोवलं, मारुती सुझुकीपासून डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांचा माफीनामा; नेमकं काय झालं जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …