Tag Archives: Marathi News

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले …

Read More »

Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

Kopardi Rape And Murder Case: कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या  करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  जितेंद्र शिंदे …

Read More »

‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Parikrama Yatra) सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढत विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देत आहेत. शनिवारी रात्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमधील (Beed) …

Read More »

रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्… मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

Morocco Earthquake : शुक्रवारी उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये (Morocco) 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंप (Earthquake) झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे तब्बल 2000 लोकांचा जीव गेला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, हा भूकंप व्हिडिओ मोरोक्कोमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कल्पना करू शकता की अल्पावधीतच …

Read More »

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC PSI Bharti 2023: एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा …

Read More »

G20 मध्ये पंतप्रधानांसमोर ‘BHARAT’;ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

BHARAT Vs INDIA:  भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी  G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव ‘भारत’ असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी …

Read More »

कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्… अजित पवार शिक्षकांवर वैतागले

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. कधी कधी त्यांच्या याच स्वभावामुळे ते अडचणीतही आले होते. मात्र आताही अजित पवार त्यांच्या खास शैलीत लोकांना सल्ले देत असतात. त्यानंतर आता इंग्रजी (English) शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना (Teacher) दिला …

Read More »

चंद्रबाबू नायडूंना अटक; 371 कोटींचा स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे?

Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या …

Read More »

उसने पैसे परत करायला गेलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार; मैत्रिणीनेच केले घृणास्पद कृत्य

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) बरेली जिल्ह्यातून एक क्रूरतेची घटना समोर आली आहे. बरेलीत एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. दोन मुस्लिम तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत मैत्रीचे नाटक करणाऱ्या एका मुलीनेच पीडितेला हॉटेलवर नेलं होतं. आरोपी सामुहिक अत्याचार करत असताना तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद केला होता. एवढेच नाही …

Read More »

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा ‘मराठा’ आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा चेहरा बनून समोर आले. त्यांनी उपोषणाला बसून आंदोलनाची ताकद वाढवली. मागचे 10 दिवस त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. राज्यातील बड्या …

Read More »

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू’

Chandrayaan 3 : चांद्रयान – 3 मोहिमुळे जगभरात भारताचा कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाने सूर्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. विरोधकांप्रमाणे आता सामान्य जनताही बेरोजगारीच्या मुद्दयावरुन सरकारला जाब विचारत आहे. अशातच लोकांनी काम मागितल्या नंतर हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्र्यांनी (Manohar Lal Khattar) दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरियानाचे मुख्यमंत्री …

Read More »

पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  पेट्रोल पंप डीलर्सची बैठक …

Read More »

G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार …

Read More »

मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, ‘तो’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.  पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार …

Read More »

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Malegaon Police) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला …

Read More »

प्रसादाच्या नावाखालीही फसवणूक! त्र्यंबकेश्वरमध्ये विकला जातोय भेसळयुक्त पेढा

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मंदिराच्या बाहेर प्रसादासाठी विकले जाणारे पेढे प्रसाद म्हणून आपण विकत घेणार असाल तर सावधान. कारण तुम्हाला विकण्यात येत असलेले मलाई पेढे (Milk Pedha) हे दुधातील नसल्याचे समोर आलं आहे. दुधात न बनवता हे पेढे दुधाचेच असल्याचे सांगत तुमच्या माथी मारले जात आहेत. नाशिक मध्ये आणि औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) टाकलेल्या छाप्यामध्ये याचे धक्कादायक वास्तव …

Read More »

बुलढाण्यात दहीहंडीच्या सणाला गालबोट; चिमुकलीचा जागीच मृत्यू तर मुंबईत 107 गोविंदा जखमी

Dahi Handi 2023 : राज्यभरात गुरुवारी मोठ्या उत्साहात गोपाळकाल्याचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे. ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत भल्यापहाटे घराबाहेर पडलेल्या गोविंदांनी मोठे थर लावत हंड्या फोडल्या आहेत. मात्र बुलढाण्यात या सणाला गालबोट लागलं आहे. बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव राजा येथे गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू …

Read More »

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे…काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की …

Read More »

राज्यातील ‘या’ 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: भारताला स्वातंत्र मिळवून 76 वर्ष उलटली आहेत. या कालावधीत देशाने खूप प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला आहे. जगभरात भारताचे कौतुक होत आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचाही मोलाचा वाटा आहे. असे असताना येथे काही गावे अजुनही दुर्देवी आयुष्य जगत आहेत. या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.  भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील 26 …

Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, वैद्यकीय टिमकडून तपासणी सुरु

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर वैद्यकीय पथक उपोषण स्थळी दाखल झाले आहे.मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सलाईन लावली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर तात्काळ वैद्यकीय टिमने त्यांची तपासणी सुरु केली. मराठा …

Read More »