बुलढाण्यात दहीहंडीच्या सणाला गालबोट; चिमुकलीचा जागीच मृत्यू तर मुंबईत 107 गोविंदा जखमी

Dahi Handi 2023 : राज्यभरात गुरुवारी मोठ्या उत्साहात गोपाळकाल्याचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे. ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत भल्यापहाटे घराबाहेर पडलेल्या गोविंदांनी मोठे थर लावत हंड्या फोडल्या आहेत. मात्र बुलढाण्यात या सणाला गालबोट लागलं आहे. बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव राजा येथे गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तर मुंबईत एकून 107 गोविंदा जखमी झाले आहेत.

मुंबई ठाण्यात उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस लागली होती. तर बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे संध्याकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. दहीहंडीची एका बाजूची दोरी भिंतीमधील गॅलरीला बांधलेली होती. त्या दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले तेव्हा भिंत कोसळली. या घटनेत दोन मुलींचा खाली कोसळल्या. त्यातील निदा रशीद खान पठाण या चिमुकलीचा मृत्यू झाला. तर अल्फिया शेख हफीज ही 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

हेही वाचा :  "...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

दुसरीकडे, मुंबईत दहीहंडी फोडताना यावर्षी 107 गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसरात्र सराव करुनही उत्साहाच्या भरात काही गोविंदा जखमी झाले आहेत. गोपाळकाल्याचा दिवस उजाडल्यापासूनच मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे थर रचताना गोविंदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मैदानांमध्ये चिखल झाल्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना पथकांसमोर अडचणी येत होत्या. 

मुंबईतील जखमी गोविंदांची आकडेवारी

केईएम रुग्णालय -31 दुखापत (07 दाखल, 23 उपचाराधीन, 1 डिस्चार्ज)
सायन रुग्णालय -07 जखमी (डिस्चार्ज)
नायर रुग्णालय -03 जखमी (डिस्चार्ज)
जे जे हॉस्पिटल -03 जखमी (डिस्चार्ज)
सेंट जॉर्ज हॉस्प -03 जखमी (डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय – 02 जखमी (ओपीडी, डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल-16 जखमी (6 उपचाराधीन, 10 डिस्चार्ज)
बॉम्बे हॉस्पीटल-1 जखमी (उपचार चालू)

राजावाडी रुग्णालय- 10 जखमी (02 अॅडमिट, 08 डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल- 01
वीर सावरकर रुग्णालय- 01
शतब्दी हॉस्पीट-3 इंजरेड (1 उपचाराधीन, 2 डिस्चार्ज्ड)

वांद्रे भाभा रुग्णालय-3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
व्ही एन देसाई रुग्णालय- 4 जखमी (डिस्चार्ज)
कूपर हॉस्पिटल- 06 जखमी (2 दाखल, 4 डिस्चार्ज)
भगवती रुग्णालय- शून्य
ट्रुमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
BDBA रुग्णालय- 9 जखमी (1 दाखल)

हेही वाचा :  Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …