Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास

Restaurant on Wheels in Maharashtra : खवय्यांसाठी आनंदाची बातमी…आता रात्री अपरात्री भूक लागल्यावर शाही आणि चविष्ट जेवण खाल्ल्या मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) महत्त्वपूर्ण पाऊल उचलं आहे.  मुंबई (Mumabi) आणि नागपुरात (Nagpur)  रेस्टॉरंट ऑन व्हील्सला (Restaurant on Wheels ) चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता राज्यात आणखी  10 ठिकाणी असं रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार आहे. 

मुंबईनंतर या ठिकाणी सुरु करणार रेस्टॉरंट

मुंबईतल सीएसएमटीमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT Mumbai) रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्यात आल्यानंतर आता लोकमान्य टिळक टर्मिनल आणि कल्याणमध्ये रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु होणार आहे. तर नागपूरनंतर नेरळ (Neral), इगतपुरी (Igatpuri) , लोणावळा (Lonavla), मिरज (Miraj), चिंचवड  (Chinchwad), बारामती (Baramati) आणि आकुर्डी (Akurdi) स्थानकावरही या रेस्टॉरंटची (Restaurant ) चव चाखता येणार आहे. 

काय आहे खासियत?

भारतीय रेल्वे रेस्टॉरंटचा ऑन व्हील्सचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. जरी हे रेस्टॉरंट रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलं तरी प्रवाशांसोबत खवय्यगिरी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. (Good news for foodies After Mumbai Nagpur Restaurant on Wheels to launch in 10 city and know whats special)

हेही वाचा :  माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे - अजित पवार

या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 

निरुपयोगी झालेले मेमू ट्रेनच्या डब्यांमध्ये हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहेत. 

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी उत्कृष्ट इंटिरियर डिझाइनिंग 

ट्रेनच्या डब्यात जेवण्याचा आनंदासोबतच प्रवासाचा अनुभव अशी रचना

आलिशान टेबलांसह सुंदर रोषणाई

पहिलं रेस्टॉरंट कुठे आहे ?

पश्चिम बंगालमधील आसनसोल रेल्वे स्थानकावर देशातील पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाले. सुंदर आणि आकर्षित अशा या रेस्टॉरंटला ‘आहार’ असं नाव देण्यात आलंय.

मुंबई दर्शन बसेससोबत करार?

मुंबईतील सीएसएमटीमधील रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून याबद्दल अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. हे रेस्टॉरंट्स मुंबई दर्शनाशी जोडण्याचा निर्णयावर विचार सुरु आहे. शिवाय 24/7 सुरु राहणारे हे रेस्टॉरंट खाजगी किंवा सार्वजनिक टुरिस्ट ऑपरेटर्ससोबत जोडण्यावरही विचार सुरु आहे. 

सेंट्रल रेल्वेने सीएसएमटी प्लॅटफॉर्म 18 च्या शेवटी हेरिटेज गॅलरी बांधली आहे. त्यामुळे मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनाच्या लिस्ट मध्ये या जागेचा समावेश करण्यात येणार आहे. यासोबत त्या पर्यटकांना या रेस्टॉरंटचा आनंद घेता येईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …