पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

Pune News : पुणे मुंबई (Pune Mumbai) दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कामामुळे रविवारी पुण्यातून मुंबईकडे सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड (chinchwad) ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान  रविवारी 20 तारखेला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी काही एक्स्प्रेससह लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुणे विभागातील लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड-खडकी स्टेशन दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान आटोमेटिक सिग्नलिंग बाबतीत महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. यामुळे काही एक्स्प्रेस गाड्या तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या12 गाड्या, तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या 12 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या झाल्या रद्द

तांत्रिक कामामुळे पुणे – लोणावळा, पुणे – तळेगाव डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्स्प्रेस गाड्या रविवारी धावणार नाहीत. रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 12127/12128 पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी, 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन, 12125/12126 पुणे-मुंबई-पुणे प्रगती, 11029/11030 मुंबई-कोल्हापुर-मुंबई कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे 'असे' झाले सेक्स्टॉर्शन

लोकल सेवाही रद्द

चिंचवड ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात येणाऱ्या तांत्रिक कामाचा परिणाम लोकल फेऱ्यांवरही होणार आहे. त्यामुळे रविवारी पुणे येथून तळेगावसाठी 06.48 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01584, 08.53 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01586 तसेच पुणे येथून लोणावळा साठी 06.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01558, 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562,11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564, 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566, 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच शिवाजीनगरहून तळेगाव साठी 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588, 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 तसेच शिवाजीनगरहून लोणावळा साठी 08.10 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01560 रद्द करण्यात आल्या आहेत.

यासोबत लोणावळा वरून 06.30 वाजता शिवाजीनगरसाठी सुटणारी लोकल क्रमांक 01553, 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, 15.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01563, तळेगाववरून 07.48 वाजता पुण्यासाठी सुटणारी लोकल क्रमांक 01585, 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01587, 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळा वरून 07.25 वाजता पुण्यासाठी सुटणारी लोकल क्रमांक 01555, 08.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01557, 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  गर्भाशय मुखाचा कर्करोग असलेल्या महिलांनाही होऊ शकते गर्भधारणा

खालील एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळात बदल

गाडी क्रमांक 12939 पुणे –जयपुर एक्सप्रेस पुणे वरून नियमित प्रस्थान वेळ 17.30 वाजता ऐवजी 17.45 वाजता सुटेल तसेच गाडी क्रमांक 22943 दौंड –इंदौर एक्सप्रेस दौंड वरून नियमित प्रस्थान वेळ 14.00 वाजता ऐवजी 18.00 वाजता सुटणार आहे.

या गाड्या विलंबाने धावणार

20 ऑगस्टला सुटणारी गाडी क्रमांक 22159 मुंबई –चेन्नई , 17222 लोकमान्य तिलक टर्मिनस –काकीनाडा पोर्ट, 11019 मुंबई –भुवनेश्वर , 22732 मुंबई –हैदराबाद आणि 19 ऑगस्टला सुटणारी गाडी क्रमांक 16332 त्रिवेंद्रम – मुंबई 11302 बेंगलुरु –मुंबई, 22194 ग्वालियर –दौंड एक्सप्रेस या गाड्या वरील कामामुळे पुणे विभागावर काही विलंबाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून…; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलं

उत्तर प्रदेशात पत्नीने पतीवर अमानवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे हात पाय …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …