सॅमसंग स्मार्टफोन युजर द्या लक्ष, या टिप्स तुमच्या डिव्हाइसला ठेवतील Over Heating पासून सुरक्षित

नवी दिल्ली:Smartphone Heating : स्मार्टफोन जास्त गरम होत असल्यामुळे अनेकदा फोनचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सॅमसंग उपकरणांबद्दल सांगायचे तर, तुम्ही या कंपनीचा फोन किंवा टॅबलेट, स्मार्टवॉच किंवा इअरबड्स वापरत असाल, तर प्रत्येक गॅलेक्सी डिव्हाइसला तापमान मर्यादा असते. पण तरीही तुमचा फोन गरम होत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

वाचा: १५० W चार्जिंगसह येणारा OnePlus चा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, पाहा ऑफर डिटेल्स

सॅमसंग मोबाईलला अशा प्रकारे गरम होण्यापासून वाचवा:

जर फोन सामान्य ऑपरेटिंग स्थितीत वापरला गेला तर फोन जास्त गरम होणार नाही. तुमचे डिव्हाइस Heat Source जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जात नाही. उदाहरणार्थ, फोन कारमध्ये ठेवणे, कडक उन्हात ठेवणे किंवा गॅसजवळ ठेवणे योग्य नाही. हे करणे टाळा. एकाच वेळी अनेक अॅप्स दीर्घकाळ चालवणे योग्य नाही. फोनलाही वेळ देणे आवश्यक आहे . तुम्ही नॉन-कंपॅटिबल, नॉन-सॅमसंग व्हेरिफाईड चार्जर किंवा केबल वापरत असल्यास, फोन जास्त गरम होऊ शकतो. हे करणे टाळा.

वाचा: सुरू झाला जबरदस्त सेल, iPhone 14 वर ९००० रुपयांची सूट, इतर फोन्सवरही ऑफ

हेही वाचा :  Weather Update : रात्री थंडी, दिवसा भयानक उष्णता त्यात आता पाऊस पडणार; हवामान खात्याचा अलर्ट

फोन हीट जनरेट करत असल्यास तुम्हाला Warning Messages दिसतील. अशात तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही फीचर्सचा अ‍ॅक्सेस बंद करण्यात येतो. जर तुम्हाला असे चेतावणी संदेश दिसले तर फोन काही वेळ बाजूला ठेवा.

Galaxy डिव्हाइस हीट जनरेट करत असल्यास करावे ? वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ फंक्शन्स वापरात नसल्यास ते बंद करा. डिव्हाइसची ब्राईटनेस देखील कमी करा.

डिव्हाइस केअर :

डिव्हाइस केअर वैशिष्ट्य वापरून फोन ऑप्टिमाइझ करा. सेटिंग्ज वर जा. नंतर बॅटरी आणि डिव्हाइस केअर वर जा. यानंतर आता Optimize वर टॅप करा. त्यानंतर Done वर क्लिक करा.

बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स बंद करा.

यासाठी तुम्हाला बॅटरी आणि डिव्हाइस केअरमध्ये जावे लागेल. नंतर बॅटरी वर जा आणि Power Saving निवडा. यानंतर बॅकग्राउंड वापर मर्यादा वर टॅप करा आणि न वापरलेले अॅप्स स्लीप करण्यासाठी चालू करा.

वाचा: Instagram युजर्स राहा अलर्ट, सुरू आहे सेक्सबॉट्सचा धक्कादायक प्रकार, पाहा डिटेल्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …