Tag Archives: entertainment

कंगना साकारणार ‘चंद्रमुखी’; रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिली माहिती

Kangana Kanaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकतीच कंगनानं तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. हा चित्रपट चंद्रमुखी  या तमिळ चित्रपटाचा सिक्वेल (Chandramukhi 2) असणार आहे.  ज्योतिका सरवनन  आणि रजनीकांत यांचा चंद्रमुखी हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट तमिळ …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट

Pallavi Joshi: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सध्या चर्चेक आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा ‘इफ्फी’ सारख्या महोत्सवात समावेश होणं ही …

Read More »

राणा दग्गुबाती दाक्षिणात्य चित्रपटांबाबत म्हणाला, ‘लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे’

Rana Daggubati: दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाला बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका राणानं साकारली. नुकताच राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबात बोलताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की राणा साऊथ चित्रपटांच्या यशाबाबात बोलत आहे. तो म्हणतो, ‘सध्या …

Read More »

Raveena Tondon : रवीना टंडनच्या अडचणीत वाढ

Raveena Tondon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveen Tondon) अडचणीत वाढ झाली आहे. रवीनाने नुकतीच ताडोबाची सैर केली आहे. या सफारीदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रवीना वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. वाघाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने रवीनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  रवीनाला अभिनयासोबत वाइल्डलाइफ फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. ती अनेकदा जंगलसफरी करताना …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या बहुचर्चित ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले असले तरीही या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता हा सिनेमा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  समीक्षकांसह चाहत्यांकडून ‘दृश्यम 2’ सिनेमाचं कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, …

Read More »

Vivek Agnihotri : ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा

Vivek Agnihotri On The Kashmir Files Unreported : ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ (The Kashmir Files Unreported) बनवणार असल्याची माहिती दिली आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द …

Read More »

Prabhas Kriti Sanon Relationship : क्रिती सेनन दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या प्रेमात?

Prabhas Kriti Sanon Relationship : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) ‘भेडिया’ (Bhediya) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच क्रिती सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतच्या (Prabhas) अफेरच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. प्रभास आणि क्रितीच्या अफेरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान आता क्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.  क्रितीने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,”हे प्रेम …

Read More »

VFX आर्टिस्टनं ‘आदिपुरुष’चा सीन केला रिक्रिएट; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Adipurush Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. काहींनी या टीझरमधील सैफ अली खानच्या लूकवर टीका केली. आता या चित्रपटातील एक अंडरवॉटर सीन एका युट्यूबर आणि VFX आर्टिस्टनं रिक्रिएट केला आहे.  आदिपुरुष चित्रपटातील अंडरवॉटर सीन रिक्रिएट …

Read More »

विक्रम गोखले यांच्या ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

Vikram Gokhale: काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलत रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात …

Read More »

ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स

Ruturaj Gaikwad: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काल (28 नोव्हेंबर) विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर आता अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्स ,सायलीनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट …

Read More »

इफ्फी ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे पहिले ट्वीट

The Kashmir Files: ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. इफ्फीमध्ये  ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवण्यात त्यानंतर नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. सध्या नदाव यांच्या या वक्तव्याची सोशल …

Read More »

‘द कश्मीर फाईल्स’ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

The Kashmir Files in IFFI: गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. इफ्फीमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आल्याने नदाव लॅपिड हे नाराज आणि आश्चर्यचकित झाले. नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे’ असं …

Read More »

‘काश्मीर फाइल्स’ला प्रोपगेंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांचे ट्विट, सिनेकलाकारांकडून प्रतिक्रिया

The Kashmir Files in IFFI : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (iffi) सोमवारी सांगता झाली. ज्युरीने ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट ‘प्रोपगेंडा आणि वल्गर’ चित्रपट असल्याचे घोषित केले, त्यानंतर या समारोप समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी सांगितले की, कार्यक्रमात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज आणि आश्चर्यचकित झाले आहेत. ते …

Read More »

Gairee : निखळ मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा ‘गैरी’; 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

Gairee : हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच ‘गैरी’ (Gairee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या ‘गैरी’ या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला आहे.  आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला ‘गैरी’ हा सिनेमा 16 …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : दहाव्या दिवशीही ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

Drishyam 2 Box Office : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही हा सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.  ‘दृश्यम 2’ची कमाई :  पहिला दिवस – 15.38 कोटी दुसरा दिवस – 21.59 कोटी तिसरा दिवस – 27.17 कोटी …

Read More »

Akshaya-Hardeek Wedding : ‘या’ दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

Akshaya-Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.  हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली …

Read More »

Rasika Dugal : रसिका दुग्गलकडून खंत व्यक्त

Rasika Dugal : गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ओटीटीमुळे लोकप्रियता मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेली 13 वर्ष बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी, प्रसिद्धीसाठी झगडणारी अभिनेत्री रसिका दुगलला (Rasika Dugal) ओटीटीने चांगलीच प्रसिद्धी दिली.  नुकत्याच एका कार्यक्रमात रसिकाने बॉलिवूडमध्ये कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,”बॉलिवूडमध्ये 13 वर्षात जी प्रसिद्धी मिळाली नाही ती ओटीटीने दिली आहे. ओटीटीने मला खूप …

Read More »

Happy Birthday Yami Gautam : ‘विकी डोनर’ने दिली यामी गौतमला ओळख

Happy Birthday Yami Gautam : सौंदर्य आणि उत्कृ्ष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी यामी गौतम (Yami Gautam) आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 नोव्हेंबर 1988 रोजी  हिमाचल प्रदेशातील बिलासपूरात यामीचा जन्म झाला. यामी अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती. पण अभिनयाने खुनावल्याने तिची ही इच्छा मागे पडली.  वयाच्या 20 व्या वर्षी यामीने …

Read More »

कांतारा फेम ऋषभ शेट्टी ‘या’ चित्रपटात करणार नाही काम?

Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पण एका आगामी चित्रपटातून ऋषभनं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील …

Read More »

Puneet Issar : ‘महाभारत’ फेम अभिनेता फसवणुकीचा बळी

Puneet Issar : ‘महाभारत’ (Mahabharat) फेम अभिनेते पुनीत इस्सार (Puneet Issar) सध्या चर्चेत आहे. पुनीत यांचं खातं हॅक करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? मीडिया रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने पुनीत इस्सार यांचे 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. पुनीत इस्सार यांच्या दक्षिण मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान …

Read More »