Prabhas Kriti Sanon Relationship : क्रिती सेनन दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या प्रेमात?

Prabhas Kriti Sanon Relationship : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) ‘भेडिया’ (Bhediya) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच क्रिती सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतच्या (Prabhas) अफेरच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. प्रभास आणि क्रितीच्या अफेरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान आता क्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे. 

क्रितीने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,”हे प्रेम नाही किंवा प्रेमदेखील नाही. आमचा ‘भेडिया’ रिअॅलिटी शोमध्ये काहीतरी बरळला आणि त्याचा नेटकऱ्यांनी वेगळा अर्थ काढला. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या. कृपया या अफवांवर विश्वास ठेऊ नका”. 

वरुण धवन नेमकं काय म्हणाला?

क्रिती सेनन आणि वरुण धवनने नुकतीच ‘झलक दिखला 10’च्या मंचावर हजेरी लावली होती. दरम्यान करणने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत वरुण म्हणाला,”क्रितीचं प्रेम एका वेगळ्याच व्यक्तीवर आहे. जो व्यक्ती सध्या मुंबईत नसून दीपिकासोबत एका सिनेमाचं शूटिंग करत आहे”. 

News Reels

प्रभास-क्रिती झळकणार ‘आदिपुरुष’ सिनेमात

क्रिती सेनन आणि प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर क्रिती जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पौराणिक शैलितील सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

हेही वाचा :  Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र जोडले जात आहे. सोशल मीडियावरही त्यांची जोडी ट्रेंड करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार,‘आदिपुरुष’चे शूट संपल्यानंतर क्रिती आणि प्रभासचं नातं अजूनही घट्ट आहे. दोघेही एकमेकांना सतत कॉल किंवा मेसेज करत असतात. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. जेव्हा दोन सेलिब्रिटी सिनेमात एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येतात. पण क्रिती आणि प्रभास याबाबतीत वेगळे आहेत. 

संबंधित बातम्या

Prabhas-Kriti Sanon : ‘बाहुबली’ प्रभास क्रिती सेननच्या प्रेमात? सोशल मीडियावर केलं अभिनेत्रीचं कौतुक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …