Adipurush : ‘आदिपुरुष’ची रिलीज डेट ढकलली पुढे

Adipurush New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा टीझर आऊट झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती देत एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे, ‘आदिपुरुष’ हा फक्त सिनेमा नाही तर श्रीरामावरील आपल्या भक्तीचे, इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव मिळणार आहे. पण त्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भारतीयांना नक्कीच अभिमान वाटेल. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही असेच राहुदेत”. 


‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर सातत्याने टीका होत आहे. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला आहे. तसेच हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’  या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. 

हेही वाचा :  पाकिस्तानी गायकानं शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

‘आदिपुरुष’ हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Adipurush : आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतने सोडलं मौन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …