Akshaya-Hardeek Wedding : ‘या’ दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

Akshaya-Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. 

हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर साखरपुड्याच्या सहा महिन्यानंतर ते लग्न करत आहेत. मध्यंतरी त्यांचे केळवण आणि अक्षयाची साडी विणतानाचे फोटो व्हायरल झाले होते. 


News Reels

गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयाने ‘मला नवरी झालेल्या पाहायला तुम्ही सज्ज आहात का? अशी पोस्ट टाकली होती. दुसरीकडे हार्दिकनेदेखील ‘घरचं केळवण’ असं म्हणत एक पोस्ट टाकली होती. हार्दिकचा हा फोटो त्याच्या एका मैत्रिणीने इन्सास्टोरीवर ठेवला आहे. या फोटोवर तिने ‘फक्त सहा दिवस बाकी’ असा हॅशटॅग वापरला होता. 

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यांचे लग्न पुण्यात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते लग्न करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

हेही वाचा :  'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

संबंधित बातम्या

Akshaya – Hardik Engaged : अखेर राणा दा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …