Akshaya Hardeek Wedding : आली समीप लग्नघटीका… राणादा अन् पाठकबाईंची लगीनघाई

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा-अंजली म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचही केळवण, मेहंदी, हळद आणि संगीत दणक्यात पार पाडलं आहे. 

अक्षयाचे चाहते भावूक

अक्षया आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षया सासरी जाणार असल्याने तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. व्हिडीओमध्ये अक्षया तिच्या बाबांना घट्ट मिठी मारुन रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षयाचे चाहते भावूक झाले आहेत. 

अक्षयाचं हटके नेलआर्ट

अक्षयाने तिच्या नेलआर्टमध्ये तिच्या लग्नाची तारीख आणि त्या दोघांचे नावाचे पहिले अक्षर म्हणजेच ‘अहा’ असे लिहले आहे. तिच्या नेलआर्टची ही हटके डिझाईन व्हायरल होत आहे.  तसेच तिची मेहंदीदेखील आकर्षक आहे. मेहंदीत तिने सप्तपदीची डिझाइन काढली आहे. 


हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. दोघांच्या डोक्यावर एकदा अक्षता पडण्याची चाहते प्रतीक्षा करत आहेत. 

हेही वाचा :  Akshaya Hardeek Wedding : नांदा सौख्यभरे! 'अहा'चं दणक्यात पार पडलं लग्न

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अक्षया आणि हार्दिक मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतील दोघांच्याही भूमिका प्रचंड गाजल्या. अक्षयतृतीयेच्या दिवशी अचानक दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्रेक्षकांच्या पसंतीची ऑनस्क्रिन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याने चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

संबंधित बातम्या

Akshaya-Hardeek Wedding : अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणारSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …