‘जवान’ चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका; ‘किंग’ खान शूटिंगसाठी चेन्नईला रवाना

Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पठाणने आतापर्यंत 508.35 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दिग्दर्शक ॲटलीच्या जवान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान चेन्नईला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

‘जवान’च्या शेवटच्या शेड्युलचे शूटिंग सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, जवान चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलची तयारी सुरू झाली आहे. ज्यासाठी शाहरुख खान आता चेस सीन शूट करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात शाहरूख खान दुहेरी भूमिका साकारणार आहे आणि त्याच्याच पात्राचा पाठलाग करणार आहे. जवान चित्रपटाचं हे शेवटचं शूटिंग असणार आहे.

दिग्दर्शक ॲटली यांनी असा दावा केला 

‘जवान चित्रपट हा मसाला एंटरटेनर असणार आहे’ असा दावा दिग्दर्शक ॲटली यांनी केला आहे. या चित्रपटात अॅक्शन सीनची जबाबदारी सुनील रॉड्रिग्स आणि एएनएल अरासू यांच्या खांद्यावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवानमध्ये लार्जर दॅन लाईफ आणि आकर्षक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  'झिरो ते हिरो'... 'Nana Patekar' अभिनयाचा हुकुमी एक्का

‘जवान’ची स्टारकास्ट 

या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर नयनतारा त्याच्याविरुद्ध भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या संदर्भात शाहरूख खान म्हणाला… 

शाहरुखने याआधीच चित्रपटाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाहरूख म्हणाला की, ‘मी तुम्हाला जवानबद्दल सध्या तरी जास्त काही सांगू शकत नाही, पण मी एक अभिनेता म्हणून चांगला वेळ घालवत आहे. दिग्दर्शक म्हणून अॅटलीसाठी हा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. त्याचं काम सर्वांनी पाहिले आहे. तो नेहमीच लोकांना जोडणारे चित्रपट बनवतो. असा जॉनर मी याआधी कधीच केला नाही.’ जवान हा चित्रपट यावर्षीच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे किंग खानच्या आगामी चित्रपटासाठी त्याचे चाहते फार उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; ‘प्रोजेक्ट के’ची रिलीज डेट जाहीर!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …