रितेशनं शेअर केला ‘वेड’चा टीझर; म्हणाला, ‘नव्या प्रवासाची सुरवात करतो’

Ved Teaser: 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ (Ved) या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर  झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनं केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia D’Souza) ही मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलियानं हिंदी ,तेलगू,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकर इत्यादी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहे. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर या चित्रपटातील गीते अजय- अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत, जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


News Reels

हेही वाचा :  Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणारी दिव्या भारती!

आज या चित्रपटाचा टीझर  मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर शेअर केला आहे . रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे.

सलमान खान करणार काम

सलमान खान वेड या चित्रपटात काम करणार आहे. काही महिन्यांपूर्वी वेड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो रितेशनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तो सलमानसोबत सेटवर मजा करताना दिसत होते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Riteish Deshmukh Movie Ved: रितेशनं शेअर केलं वेड चित्रपटाचं पोस्टर; म्हणाला, ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण…’Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …