‘महाभारत’ सिनेमाची तयारी सुरू,अक्षयपासून रणवीरपर्यंत असतील स्टार्स, किती असेल बजेट?

मुंबई : अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, रहस्य यानंतर बाॅलिवूड आता पौराणिक कथांकडे वळतंय. अनेक वर्षांनंतर महाभारतावर सिनेमा बनणार आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या डी २३ एक्सपोमध्ये यावर सिनेमा करण्याची घोषणाही केली गेली. कौरव आणि पांडवांच्या आयुष्यावरचं महाभारत पहिल्यांदा बी.आर. चोप्रा टीव्हीवर घेऊन आले होते. ते लोकप्रिय झालं होतं. आता दिग्दर्शक फिरोज नादियाडवाला यावर सिनेमा करतायत. या सिनेमात बाॅलिवूडचे अनेक कलाकार दिसतील. याचं बजेट ऐकून भल्या भल्यांना धक्का बसला आहे.

मी माझ्या आयुष्यात काहीही करो… एक्स्टा मॅरेटिअल अफेअरच्या आरोपांवर स्पष्टच बोलली निशा रावल

फिरोज नादियाडवालानं हेरा फेरी आणि वेलकम यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली. मीडिया रिपोर्टसनुसार फिरोजनं या सिनेमावर काम करणं सुरू केलं आहे. असं म्हणतात, या सिनेमाच्या पटकथेवर गेली ४-५ वर्ष काम सुरू आहे. प्री प्राॅडक्शनमध्ये काही वर्ष जातील. महाभारत २०२५ मध्ये तयार होईल. हा सिनेमा हिंदीत असेल. नंतर इतर भाषांमध्ये डब होईल.


फिरोज नादियाडवालांचं म्हणणं आहे की हाॅलिवूडचा द लाॅर्ड ऑफ रिंग्स, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वाॅर्स, हॅरी पाॅटर यांना हा महाभारत सिनेमा टक्कर देईल. त्याच पातळीवर तो तयार होईल. तीन तास असणाऱ्या या सिनेमाचं बजेट असेल ७०० कोटी रुपये. भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात मोठं बजेट असणारा हा सिनेमा असेल.

महेशचा कॅन्सर आमच्यासाठी धक्कादायक होता पण… मेधा मांजरेकरांनी

आता सिनेमात कोण असतील कलाकार? सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर हे कलाकार तर नक्कीच असणार आहेत. स्त्री भूमिका कोण नायिका करणार, हेही अजून गुलदस्त्यात आहे. अजून पूर्ण माहिती कळली नाही. ती काही दिवसांनी समोर येईल.

दिग्गज कलाकारांसोबत काम करणं हा महत्वाचा होमवर्क | रसिका आगाशे



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘राजसा जवळी जरा बसा’ फेम लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेकर याचं निधन

मुंबई, 14 सप्टेंबर : महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक जुन्या मराठी सिनेमांमध्ये अनेक …

या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर; राम अवतारात दिसणार प्रभास

 मुंबई, 14 सप्टेंबर : भारतात बाहुबली अशी ओळख अभिनेता म्हणजेच प्रभास. बाहुबलींनंतर प्रभासने अतिशय मोजकेच …