‘राजसा जवळी जरा बसा’ फेम लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेकर याचं निधन

मुंबई, 14 सप्टेंबर : महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक जुन्या मराठी सिनेमांमध्ये अनेक महान कलाकारांनी आपल्या लावण्या सादर केल्या आहेत. अशीचं एक प्रसिद्ध लावणी म्हणजे ‘राजसा जवळी जरा बसा’. या लावणीनं लाखो प्रेक्षकांना वेड लावलं. या लावणीवर अदाकारी करुन ही लावणी अजरामर करणाऱ्या लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेर यांचं निधन झालं आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या. उभं आयुष्य लावणीसाठी खर्ची करणाऱ्या गुलाबबाईंचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं मोठ्या सिनेसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत आणि बैठकीच्या लावणीची अदाकारीसाठी गुलाबबाई संगमनेकर प्रसिद्ध होत्या. त्यांना नृत्यचंद्रिका म्हणून ओळखलं जात होतं.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही लावणी आजही तितक्याच आवडीनं ऐकली आणि नाचली जाते. लता दीदींनाही ही लावणी विशेष आवडायची आणि ही लावणी गुलाबबाईंनी करावी अशी इच्छा लता दीदींनी  व्यक्त केली होती. लता दीदींच्या शब्दानुसार गुलाबबाईंनी दर्जेदार लावणी सादर केली होती. ही लावणी आज अजरामर झाली आहे.

हेही वाचा – Kshitish Date : ‘…अन मी त्यांना त्यांचा एकनाथच वाटलो’; क्षितिश दातेनं सांगितला हृदस्पर्शी किस्सा

90व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांना दोन वर्षांपूर्वीच विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गुलाबमावशी संगमनेरकर या नावानं त्या प्रसिद्ध होत्या.  प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या अनेक दर्जेदार लावण्या त्याकाळी गुलाबबाईंनी गायल्या होत्या. त्या लावण्या त्यावेळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित केल्या जात होत्या.  आयुष्यात अनेक पुरस्कार मिळवलेल्या गुलाबबाईंनी उतरत्या काळात रज्जो सारख्या सिनेमात काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची तब्बल आठ तास चौकशी

मुंबई,14  सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज दिल्लीत चौकशीसाठी हजर झाली होती. दिल्लीतील मंदिर …

रणवीर सिंगपासून अक्षयपर्यंत कोण कोण झळकणार महाभारतात घ्या जाणून!

मुंबई, 14 सप्टेंबर :  बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमे बनवायचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत फक्त एका …