प्रिया बापटला येतेय उमेश कामतची प्रचंड आठवण, म्हणून गुणगुणतेय गाणं; Video झाला व्हायरल

मुंबई : अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. अनेकदा त्या पोस्टमध्ये पती उमेश कामतही असतो. दोघांमधलं बाँडिंग सुंदर आहे आणि चाहत्यांना ते नेहमी जाणवत राहतं. आताही प्रियानं एक छान पोस्ट शेअर केलीय.

या पोस्टमध्ये एका प्रसिद्ध गाण्यावर प्रिया थिरकत आहे. ओ सनम, मेरे प्यार की कसम… हे ते गाणं. त्यावर प्रियानं लिहिलं आहे, मी उमेशला जेव्हा खूपच मिस करत असते, त्याची खूप आठवण येत असते, तेव्हा हे गाणं ऐकते.’

ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी राजामौली यांना दिले १० कोटी? काय आहे सत्य

प्रिया बापट दुसरीकडे कुठे शूटिंग करत असावी. मध्ये वेळ मिळाल्यावर तिनं हे रील केलं आणि पोस्ट केलं. तिला यावर खूपच प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

प्रिया बापट नेहमीच तिचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशलमीडियावर शेअर करत असते. उमेश कामत आणि प्रियाच्या कपल गोल्सनाही नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत असतात. प्रियाने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टमधल्या तिच्या लुकवर तिचे चाहते फिदा असतात. नुकतीच ती भर पावसात एका वेगळ्याच अंदाजात रस्त्यावर फिरताना दिसली. सतरंगी अंदाज म्हणत प्रियाने हा शेअर केलेला हा अवखळपणा नेटकऱ्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे.

राणी यांच्याकडील कोहिनूर भारतात येणार का? रवीनाने शेअर Video

सध्या प्रिया ना कुठल्या सिनेमात दिसतेय ना मालिकांमध्ये. दादा एक गुड न्यूज आहे या तिच्या निर्मिती असलेल्या नाटकाची धुरा ती बॅकस्टेज राहून सांभाळतेय. या शिवाय तिचा एक साडी ब्रँड आहे. काही जाहीरातींमधून मात्र प्रियाचं आणि तिच्या अभिनयाचं दर्शन होत असतं.

मुंबई एयरपोर्टवरील शमिताच्या पांढऱ्या शुभ्र कॅज्युअल लूकची चाहत्यांना भुरळ

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …