प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी टाकलंय चाहत्यांना कोडं, पाहा तुम्हाला येतंय का उत्तर!

मुंबई : प्रिया बापट आणि उमेश कामत नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कपल म्हणून ते अनेक गोष्टी एकत्र करतात आणि शेअर करतात. कधी जिमला जातानाचा फोटो शेअर करतात तर कधी परदेशात फिरतानाचा फोटो. पण यावेळी त्यांनी त्यांच्या फॅन्सनाच कोड्यात पाडलं आहे.

प्रिया आणि उमेश यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅन्सना एक प्रश्न विचारला आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर प्रश्न विचारला आहे की, कुठला आहे शो? आणि एपिसोडही. चला चला सांगा पटकन, कुठल्या शो आणि एपिसोडमधला फोटो आहे हा?

बिग बॉस १६मध्ये प्रेक्षकांना मिळणार मोठा धक्का; थीम लीक झाल्यानं चर्चेला उधाण

हा फोटो आहे ‘आणि काय हवं? सीझन २’ या वेबसीरिजमधला. हा एपिसोड आहे ६. आश्चर्य म्हणजे यावर फॅन्सच्या प्रचंड संख्येनं कमेंट आल्या आहेत. बऱ्याच जणांनी अचूक उत्तर दिलं आहे. ती उत्तरं पाहून प्रियानंही आश्चर्य व्यक्त केलंय. तिनं कमेंट लिहिली आहे, अरे वा, इतक्या जणांनी अचूक उत्तर दिलं.!

काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘दादा एक गुडन्यूज आहे’ या नाटकाचा परदेश दौरा सुरू होता. दुबई, अबुधाबी इथे ते नाटक घेऊन गेले होते. त्याआधी महाराष्ट्रातही दौरे सुरू होते. त्यामुळे आता थोडा वेळ मिळाला आहे. म्हणून दोघं भर पावसात उठून जिमला निघालेत. ही पोस्ट त्यांनी शेअर केली होती. खरं तर बाहेर पाऊस पडत असताना भल्याभल्यांना झोपून रहावसं वाटतं. पण प्रिया आणि उमेश हे सकाळी परुळेकर जिममध्ये गेले.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आदिनाथ कोठारे बोललाच, वाचा काय म्हणाला अभिनेता

नुकताच उमेश कामतनं एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात तो आणि अभिनेता आशुतोष गोखले तुफान नाचतायत. एखाद्या हाॅटेलमध्ये ते दिसतायत आणि अचानक डान्स करायला सुरुवात केली. या व्हिडिओबरोबर उमेशन कॅप्शन पोस्ट केली आहे. वि.द. घाटे यांचं वाक्य आहे, थोडे वेडे व्हा वेडे. मनमोकळं रडा, मनमोकळं हसा. ते लिहून कंसात उमेशनं लिहिलंय, मनमोकळं नाचा- मी.

शाहरुख- कतरिनाचे सिनेमे

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous कधीतरी आमच्या डोळ्यांनाही सुख मिळू द्या; रणवीरच्या न्यूड फोटोवर अभिनेत्रीची बोल्ड प्रतिक्रिया
Next राष्ट्रकुलमध्ये भारताला धक्का; स्पर्धा सुरू होण्याआधी मोठा सेटबॅक

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …