सासूच्या पहिल्या स्मृतीदिनी भावुक झाली ट्विंकल खन्ना, शेअर केली खास पोस्ट

मुंबई : ट्विंकल खन्‍ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांना आणि तिच्या फॉलोअर्सना तिच्या आयुष्यातील अनेक घटनांबाबत पोस्ट करून माहिती देत असते. ट्विंकलनं तिच्या इन्स्टाग्रामवर तिची सासू आणि अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia) यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्तानं भावुक होत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं सासूचं अतिशय समर्पक शब्दांत वर्णन केलं आहे.

‘वर्षा’बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

ट्विंकलनं सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये अक्षय कुमारचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. त्यात अरुणा यांच्याबरोबर अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अक्षयची बहिण अलका भाटिया आणि तिचे पती हीरनंदानी दिसत आहे. या पाचही जणांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत ट्विंकलनं लिहिलं आहे की, ‘एक माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या की, एका मैदानात दोन सिहिंणी राहू शकत नाही. त्यांचा इशारा आम्हा दोघींकडे होता.’


ट्विंकलनं शेअर केलेल्या पोस्टवर बॉबी देओलनं हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. या दोघांनी बरसात सिनेमामध्ये काम केलं होतं. अक्षयची (Akshay Kumar) आई अरुणा याचं गेल्यावर्षी ८ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झालं होतं. तर आज म्हणजे ९ सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस आहे. आज अक्षय ५५ वर्षांचा झाला. फिटनेसच्याबाबतीत अक्षय त्याच्या समकालीन कलाकारांपेक्षा खूपच सरस आहे.

कितीही सिनेमे होऊ देत फ्लाॅप,अक्षय कुमारचं कधीच होणार नाही नुकसान, एकूण संपत्तीबद्दल इथे वाचा

डिझाईनर साडीत नोरा दिसतेय खूपचं हॉट



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. …

कुशल बद्रिकेने बाप्पाकडे मागितलं अजब मागणं; म्हणाला ‘पुढच्या वर्षी थोडी….’

मुंबई, 09 सप्टेंबर :  ‘चला हवा येऊ द्या या’ कार्यक्रमातून अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा …