कुशल बद्रिकेने हा व्हिडीओ त्याचा कलाकार मित्र विजू माने यांच्यासोबत केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशल विजू मानेच्या घरी गणपतीला जेवण्यासाठी आला आहे. . त्यावेळी विजू माने त्याला अॅलेक्साबद्दल सांगतो. तो म्हणतो, ”बाप्पा आहे तर जेवून जा. हे बघ हे एक यंत्र आहे. ही अॅलेक्सा. हिला जे सांगू ते ती करते. गाणं लाव म्हटलं लावते, जी माहिती हवी ती देते. त्यावर कुशल म्हणतो, बरं झालं तुम्ही हिला घेतलं. घरात एक तरी बाई हवीच तुमचं ऐकणारी. हे बोलत असतानाच विजू मानेची पत्नी तिथे जेवणाची दोन ताटं घेऊन पोहोचते. ती सगळा संवाद ऐकते आणि ती ताटं घेऊन निघून जाते.”
विजू माने म्हणतो, आता काही जेवण मिळणार नाही. मग तो पत्नीला हाक मारत आत निघून जातो. असा हा गमतीशार व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओला कुशलने मजेशीर कॅप्शन दिले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी बुद्धी द्या’ असं मागणं त्याने बाप्पाकडे मागितलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा – Prajakta Mali :’तो फोन आल्यावर खूप आनंद झाला…’; नेमकं कशाविषयी बोलतीये प्राजक्ता माळी
कुशलच्या या मजेदार व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत म्हटलंय, आता जेवायला दुसरं ठिकाण शोधा, तर दुसऱ्या चाहत्यानं त्याचं कौतुक केलं आहे. कुशलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या