सुबोध भावे आणि महेश मांजरेकर एकत्र, घेऊन येतायत नवा सिनेमा

मुंबई : टीव्ही शो, सिनेमा, वेब सीरिज अशा सगळ्या माध्यमांत सुबोध भावेचा संचार आहे. अभिनयाबरोबर तो स्वत: दिग्दर्शनातही उतरला आहे. आता सुबोधनं एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

ऐन गणपतीत कुशल बद्रिकेच्या तोंडचा घासच कोणी काढून घेतला? हा Video पाहिलात तर कळेल!

अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर आपल्या नव्या सिनेमाबद्दल लिहिलं आहे. हा सिनेमा आहे निरवधी. यात सुबोध भावेबरोबर उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवळे यांच्याही भूमिका आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं आहे. सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. यापेक्षा जास्त माहिती सुबोधनं दिलेली नाही. महेश मांजरेकरांनीही ही पोस्ट शेअर केली आहे.

यावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्ही आता २०२३ची वाट पाहतो, असंही म्हटलं आहे. काहींनी निरवधी शब्दाचा अर्थ विचारला आहे. एकूणच सुबोधच्या आता बऱ्याच कलाकृती पाहायला मिळणार आहेत. दिवाळीत त्याचा हर हर महादेव सिनेमा येतोय. त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. छत्रपतींची भूमिका साकारणार आहे अभिनेता सुबोध भावे. सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे हे विशेष.

लेखक सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ या कादंबरीवर आधारीत कालसूत्र (Kalsutra) ही थ्रिलर, उत्कंठावर्धक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात सुबोधची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच अभिनेता दिग्दर्शकाच्या भूमिकेतही आहे. ते मारवा दिग्दर्शित करतोय. सिनेमाचं लेखन केलंय वैभव जोशींनी. नितीन वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमात सायली संजीवही आहे.

अचानक असं काय झालं की लाडाची बॉस आता नव्या वेळेत भेटणार

याशिवाय सध्या सुबोधचा बस बाई बस हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. एका हिंदी सिनेमात सुबोध संत तुकाराम साकारतोय, अशीही बातमी काही दिवसांपूर्वी होती.

लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत अभिनेता सिद्धार्थ जाधव वादनात दंग

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा ; लेकीसह झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

मुंबई, 09 सप्टेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातत्. सतत काहीतरी …

ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. …