महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा ; लेकीसह झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

मुंबई, 09 सप्टेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातत्. सतत काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर असतो. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात. महेश मांजरेकरांचा चित्रपट म्हणजे काहीतरी खासच असणार. दमदार कथा आणि संगीत तसेच अभिनय याचा पुरेपूर मेळ त्यांच्या चित्रपटात असतो. अलीकडेच त्यांच्या ‘पांघरूण’, ‘दे धक्का’  या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटांतून त्यांची लेक गौरी इंगवले झळकली होती. आता महेश मांजरेकर पुन्हा नवीन सिनेमा घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

या नवीन सिनेमाचं नाव ‘निरवधी’ असं आहे. या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगवले पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे कलाकार झळकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं आहे. सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. ‘निरवधी’ चित्रपटाच्या नावाविषयी चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या चित्रपटाचे कथानक काय असेल, कलाकारांच्या भूमिका काय असतील याविषयी कोणतीही माहिती समोर आली नसली तरी या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुबोध भावे सध्या  टीव्ही, चित्रपट, वेबसरीज  अशा सगळ्या माध्यमात महत्वाच्या भूमिका निभावत आहे. नुकतंच  त्याने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात झी मराठीवर त्याचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. तसेच ‘मारवा’ या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे.

हेही वाचा – Rutuja Bagawe : ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच ‘कालसूत्र – प्रथम द्वार | मृत्यूदाता’ ही  नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे. आता पुन्हा एकदा नवीन चित्रपटाची घोषणा ऐकून सुबोधने चाहते भलतेच खुश झालेत.

तर चित्रपटातील दुसरा मुख्य अभिनेता उपेंद्र लिमये त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. नुकताच तो ‘सर सेनापती हंबीरराव’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. …

कुशल बद्रिकेने बाप्पाकडे मागितलं अजब मागणं; म्हणाला ‘पुढच्या वर्षी थोडी….’

मुंबई, 09 सप्टेंबर :  ‘चला हवा येऊ द्या या’ कार्यक्रमातून अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा …