ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. आज वाढदिवसादिवशी ऋतुजानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत तिने आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीची माहिती चाहत्यांना दिली आहे. ती खूपच आनंदी दिसत आहे. या गोष्टीमुळे तिच्यावर सध्या  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ऋतुजाने आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. ते म्हणजे तिने स्वतःच घर घेतलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना हि माहिती तिने  दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना ऋतुजा खूपच भावुक झालेली दिसतीये. तिने या पोस्टमधून घराचे फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींचे म्हणजेच आई बाबांचे आभार मानले आहेत.  तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘स्वतः चं घर, जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न कर पण त्या आधि independent हो स्वतःचं घर घे…आई thank you sooooo much हे स्वप्न तू दाखवलस…बाबा तूमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं आईने स्वप्न दाखवल पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी”

पुढे ती म्हणतेय कि, ”भौतिक गोष्टित मी success नाही मानात ना समाधान शोधत पण तूमचं स्वप्न पूर्ण करु शकले हयाचा आनंद खुप आहे जो मी शब्दात नाही मांडू शकत. तुमच्या चेहेरयावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे मला अजून कष्ट करण्याची उमेद देतात.”

हेही वाचा – Kushal Badrike : कुशल बद्रिकेने बाप्पाकडे मागितलं अजब मागणं; म्हणाला ‘बाप्पा पुढच्या वर्षी थोडी…’

ऋतुजाची हि पोस्ट पाहून सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांसहित चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

ऋतुजानं २००८ मध्ये ह्या गोजिरवाण्या घरात मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केलं होतं. ऋतुजाला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ‘अनन्या’ या नाटकातील भूमिकेसाठी देखील तिचं सर्वत्र कौतुक झालं. अलीकडेच तिने सुबोध भावासोबत चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. आता तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा ; लेकीसह झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

मुंबई, 09 सप्टेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातत्. सतत काहीतरी …

कुशल बद्रिकेने बाप्पाकडे मागितलं अजब मागणं; म्हणाला ‘पुढच्या वर्षी थोडी….’

मुंबई, 09 सप्टेंबर :  ‘चला हवा येऊ द्या या’ कार्यक्रमातून अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा …