एएनआय’ ने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मीडियाशी संवाद साधताना कंगना म्हणाली की, ”मी हे नेहमीच म्हणत आलेय आणि आजही म्हणेन की, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेय ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे शक्य झाले आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला मागून मिळालेले नाही, तर अनेक लढ्यांतून स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे आणि मला वाटते की, नेताजी आणि सावरकरजींसारख्या इतर अनेक क्रांतिकारकांचा संघर्ष पूर्णपणे नाकारला गेला आहे. केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले हीच बाजू दाखवण्यात आली. पण, तसं नाहीये.’’
#WATCH | Delhi: “Struggle of revolutionaries, be it Netaji or Savarkar had been completely denied as only one side was shown,” says Actor Kangana Ranaut during inauguration of ‘Kartavya Path’ & unveiling of statue of Netaji Subhash Chandra Bose at India Gate pic.twitter.com/fGxIyQKCcL
— ANI (@ANI) September 8, 2022
एका प्रश्नाचे उत्तर देताना कंगना म्हणाली की, ‘मी नेताजींबद्दल नेहमीच स्पष्टपणे बोलते. मी नेहमीच म्हणत आलेय की, मी गांधीवादी नाही, मी नेताजी सुभाष चंद्रवादी आहे. मी त्या लोकांपैकी एक आहे ज्यांचा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा यावर विश्वास आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि या दिवसासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. नेताजी आणि त्यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. आम्हाला स्वातंत्र्य मागून मिळालेले नाही, आम्ही आमच्या हक्काचे स्वातंत्र्य मिळवले आहे.’
हेही वाचा – Brahmastra Review: 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय ‘ब्रह्मास्त्र’; समोर आला सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू
कंगनाने केलेले हे बेधडक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक जण तिला पाठींबा देत आहेत तर काही जण तिला विरोध देखील करत आहेत. येणारेय काळात कंगना इतिहासातील एका महत्वाच्या प्रसंगावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. ‘इमर्जन्सी’ असं या चित्रपटाचं नाव असून कंगना या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. तिच्या लूकची सगळेकडेच चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या