महाराष्ट्रात गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा विराजमान होतो. या दहा दिवसांत गणरायाची मनोभावे सेवा केली जाते. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण मोठ्या उत्सहात हा सण साजरा करतात. सोबतच सेलिब्रेटी ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. महारष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गज याठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.
Deepika Padukone and Ranveer Singh today with CM Eknath Shinde at his residence for ganesh darshan ❤️ pic.twitter.com/bdscpfawZq
— Deepika Files (@FilesDeepika) September 8, 2022
नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्री सारा अली खानसुद्धा उपस्थित होती. या तिघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये तिन्ही सेलिब्रेटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना दिसून येत आहेत. विरल भयानी आणि काही फॅन पेजने हे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

(हे वाचा:‘धर्मवीर’ फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण? )
यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पारंपरिक अंदाजात दिसून आले. दीपिकाने मोठ्या बनारसी दुपट्ट्याचा चुडीदार परिधान केला होता. तर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये दिसून आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या