Msrtc Strike | “….तर कोल्हापुरी हिसका दाखवू”, एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक

प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (St Transport Merger) करण्यात यावं, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपेक्षा अधिक काळाहून संप सुरु आहे. सरकारने काही प्रमाणात सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करुन दिली. त्यानंतर काही कर्मचारी पुन्हा रुजु झाले. मात्र बरेचसे कामगार हे अजूनही विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. या विलीनीकरणाचं घोंगडं अजूनही भिजतचं आहेच. (msrtc empolyee family aggrecive for to demanded st coroporation merger in state government at kolhapur) 

या मुद्द्यावर अजून कोणता तोडगा न निघाल्याने कर्मचारी, त्यांच्या कुटूंबीयांनी आणि श्रमिक संघटनांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.    

सरकारला कुटुंबियांचा इशारा

या मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटूबीयांनी सहभागी घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी संपाला आजपर्यंत पाठिंबा दिला. आता मात्र आम्ही सुद्धा संपात उतरून कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिला.

18 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विलीनीकरणाचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मांडण्यासाठी आणखी 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारला 18 फेब्रुवारीला हा अहवाल सादर करायचा आहे. 

हेही वाचा :  घरात मांजर पाळताय? पालिकेकडून आलेली नवी नियमावली एकदा व्यवस्थित वाचा

राज्य सरकारने या अहवालासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला होता. त्यानुसार सरकारने ही मुदतवाढ दिली. याआधी 12 आठवड्यांची देण्यात आली मुदत ही याआधीच संपलेली असल्याने हा वाढीव वेळ देण्यात आला. 

पुढील सुनावणी केव्हा? 

दरम्यान या एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयात पुढील सुनावणी ही 22 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं कुटुंबियांचं लक्ष लागून राहिलं आहे.   Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले ‘तुझी आता…’

सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला …

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर …