क्रीडा

भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भूरळ! राहुलच्या आधी या खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ

Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आज खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे.   केएल राहुल आणि अथिया शेट्टी ( kl rahul and athiya shetty ) टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत आज सात …

Read More »

तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला… लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, पाहा खास PHOTO

KL Rahul Athiya Shetty Wedding : सेलिब्रेटीचं लग्न म्हटलं की चाहत्यांना उत्सुकता असते त्यांच्या फोटोजची, त्यांनी परिधान केलेल्या खास ड्रेसेसची. अशातच मागील बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा पार पडला आहे. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले असून अथियाने एक खास …

Read More »

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊसाचा व्यत्यय? कसं असेल इंदूरचं वातावरण

IND vs  NZ, 3rd ODI : : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना उद्या म्हणजेच 24 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. इंदूरमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड आजवर दमदार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे न्यूझीलंडला व्हाई़ट वॉश …

Read More »

स्टार अष्टपैलू अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात, जाणून घ्या कोण आहे मेहा पटेल?  

Team India : एकीकडे भारतीय संघाचा स्टार खेळाड केएल राहुल (KL Rahul) अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकल असून आता आणखी एक क्रिकेटर बोहल्यावर चढणार आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतच केएल राहुल याचं आथियासोबत लग्न झालं असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे …

Read More »

महाकाल देवाच्या दर्शनाला पोहोचले भारतीय क्रिकेटर, ऋषभ पंतसाठीही केली प्रार्थना

Team India at Mahakaleshwar Mandir : सध्या भारत न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) एकदिवसीय मालिका खेळत असून तिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू (Team India) जगप्रसिद्ध अशा बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि भारतीय क्रिकेट संघाशी संबधित काही कर्मचारी दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली. याशिवाय बाबा …

Read More »

Sarfaraz Khan धाकटा भाऊही दमदार फॉर्मात, 34 चौकार आणि 9 षटकारांसह ठोकल्या 339 धावा

Sarfaraz Khan : मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान(Sarfaraz Khan)  मागील काही दिवसांपासून सारखा चर्चेत आहे. या युवा फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. यावर अनेक दिग्गजांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण आता याच सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान चर्चेत आला आहे. तोही क्रिकेटर असून मुशीरने सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावलं आहे. …

Read More »

ICC कडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंना स्थान

ICC Women’s T20I Team of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट महिला T20 संघ जाहीर केला आहे. या संघांत, आयसीसीने 2022 वर्षात टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना निवडलं आहे. ICC ने जाहीर केलेल्या 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला T20 संघात भारताच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर …

Read More »

कमाल फॉर्मात असणाऱ्या कुलदीपने बुमराहला टाकलं मागे, आता रवी शास्त्रींच्या रेकॉर्डवर नजर

Kuldeep Yadav in India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा सामना 24 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar cricket Stadium) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा विक्रम तो …

Read More »

ICC टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार म्हणून बटलरचं नाव, सर्वाधिक भारतीय खेळाडूंना स्थान

ICC Mens T20I Team of the Year 2022 : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. ज्यानंतर आता आयसीसी पुरस्कारही जाहीर होत असून आयसीसीने नुकतीच आयसीसी …

Read More »

Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत

Sania Mirza News : भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australia Open 2023) स्पर्धेत पराभूत झाली आहे. ज्यामुळे निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या सानिया मिर्झाला (Sania Mirza) महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. या महिला दुहेरी जोडीला बेल्जियमच्या अ‍ॅलिसन व्हॅन उटवांक आणि युक्रेनच्या अ‍ॅनहेलिना कॅलिनिना यांनी 4-6, 6-4 आणि 2-6 अशा फरकाने पराभूत केले. सानियाने …

Read More »

इंदूरमध्ये भारताचा दबदबा, न्यूझीलंडचा विजय अवघड, हे मोठे वन-डे रेकॉर्ड माहित आहेत का?

India records at Holkar Cricket Stadium Indore : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु वनडे मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 24 जानेवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची संधी आहे. विशेष …

Read More »

सर्वोत्कृष्ट संघ ते तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, 18 आयसीसी पुरस्कार लवकरच होणार जाहीर

ICC Awards News : 2022 या वर्षभरात विविध क्रिकेट प्रकारात (Cricket News) विविध खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ज्यानंतर  काही दिवसांपूर्वी आयसीसी पुरस्कारांची (ICC Awards) नामांकन जाहीर झाली. ज्यानंतर आता सोमवारपासून कोणता पुरस्कार कोणाला मिळाला? हे देखील जाहीर होणार आहे. 23 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत विविध श्रेणीतील एकूण 18 पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पाच सांघिक पुरस्कार आणि 13 …

Read More »

केएल राहुल अन् अथियाच्या लग्नसोहळ्याला जय्यत सुरुवात!

Athiya shetty-KL Rahul Wedding : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लाडकी लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. चार वर्षे अथियाला डेट केल्यानंतर अखेर आज केएल राहुल बोहल्यावर चढणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.  अथिया-राहुल किती वाजता लग्नबंधनात अडकणार?  मीडिया रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी …

Read More »

क्रिडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

Wrestlers Protest Row: पर्यवेक्षण समितीची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत केंद्र सरकारनं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे सर्व कार्यक्रम आणि कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं शनिवारी (21 जानेवारी) सांगितलं की, यामध्ये सध्या सुरू असलेल्या क्रमवारीतील स्पर्धेचं निलंबन आणि सुरू असलेल्या उपक्रमांसाठी सहभागींकडून आकारलं जाणारं प्रवेश शुल्क परत करणं याचादेखील समावेश आहे.   सरकारनं 20 जानेवारी रोजी WFI च्या दैनंदिन …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं काही!टॉस जिंकल्यावर रोहित शर्मा पडला विचारात

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पार पडला. भारतानं 8 गडी राखून विजयही मिळवला. पण या सामन्याच्या नाणेफेकीवेळी असं काही घडलं जे आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच घडलं होतं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीदरम्यान एक मजेदार घटना घडली. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून …

Read More »

तुझी-माझी जोडी जमली! विश्वचषकाआधी भारताला मिळाले दमदार सलामवीर, पाहा आकडेवारी

Rohit and Shubhman : भारतीय संघासाठी (Team India) 2023 वर्षाची ची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने 3 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध (T20) वर्षातील पहिला सामना खेळला, ज्यामध्ये संघाने 2 विकेट राखून विजय मिळवला. यानंतर, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची घरगुती मालिका खेळली, ज्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्या संघाचा 3-0 असा पराभव केला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांमध्ये भारताची सलामीची जोडी कमाल …

Read More »

Nagpur : क्रीडा महर्षी पुरस्कार सोहळ्याला ग्रेट खलीची उपस्थिती, नितीन गडकरींनी केल्या महत्वाच्

Khasdar Krida Mahotsav : खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मागील 13 दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा उद्या, रविवारी 22 जानेवारी रोजी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी क्रीडा महर्षी पुरस्कार देण्यात येतो. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाचा क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि …

Read More »

केदार जाधवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! कौटुंबिक कारण देत रणजीतून माघार घेतली अन् बारामतीत..

Kedar Jadhav : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) सध्या टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात आयपीएलमध्येही (IPL) त्याला कोणत्या संघाने विकत न घेतल्याने तो मैदानातच दिसत नव्हता. पण यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने काही चांगल्या खेळी केल्या, ज्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. पण आता या सगळ्यामध्येच त्याच्या एका कृतीमुळे तो अडचणीत येईल असं दिसून येत …

Read More »

उत्कृष्ट गोलंदाजीनंतर टीम इंडियाची दमदार फलंदाजी, 8 गडी राखून न्यूझीलंडवर विजय

India vs New Zealand ODI : रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर (IND vs NZ) 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवला आहे. सामन्यात आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतानं बाद केलं. त्यानंतर 109 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8विकेट्सनी सामना जिंकला.  सामन्यात गोलंदाजीत …

Read More »

Watch : हार्दिक पांड्याने रायपूर वनडेत कॉन्वेची घेतलेली विकेट होतेय व्हायरल, पाहा VIDEO

India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जा आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या न्यूझीलंड संघाची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यानी लवकर सुरुवातीच्या विकेट गमावल्या. अवघ्या 10.3 षटकांत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ज्यानंतर 108 …

Read More »