तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला… लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, पाहा खास PHOTO

KL Rahul Athiya Shetty Wedding : सेलिब्रेटीचं लग्न म्हटलं की चाहत्यांना उत्सुकता असते त्यांच्या फोटोजची, त्यांनी परिधान केलेल्या खास ड्रेसेसची. अशातच मागील बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा पार पडला आहे. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले असून अथियाने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने एक सुंदर इंग्रंजी कॅप्शनही दिलं आहे.

अथियाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तुझ्यामुळे, मी प्रेम कसं करावं हे शिकले…” आज, आमच्या सर्वात प्रियजनांसोबत, आम्ही त्या घरात लग्न केलं ज्या घराने आम्हाला खूप आनंद आणि शांतता दिली. कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्ही या एकत्रतेच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद मागतो.

पाहा अथियाची पोस्ट आणि लग्नाचे खास फोटो


news reels New Reels

लवकरच ग्रँड रिसेप्शन होणार

अथिया आणि केएल राहुल यांनी आज केवळ 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.  सुनील शेट्टी यांच्या ‘जहान’ बंगल्यात 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तसेच अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर, जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ, अनुपम खेर, वरुण ऐरन, ईशांत शर्मा आणि आदित्य सील या सेलिब्रिटींनीदेखील लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.  यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा :  सीमारेषेवर अॅश्टन अगरची जबरदस्त फिल्डिंग, चक्क एका हातानं वाचवला षटकार, पाहा व्हिडीओ

अथिया-केएल राहुलची लव्हस्टोरी 

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.

हे देखील वाचा-Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …