इंदूरमध्ये भारताचा दबदबा, न्यूझीलंडचा विजय अवघड, हे मोठे वन-डे रेकॉर्ड माहित आहेत का?

India records at Holkar Cricket Stadium Indore : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु वनडे मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 24 जानेवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे इंदूरमधील भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील आजवरचा फॉर्म दमदार आहे. ज्यामुळे न्यूझीलंडचं अखेरचा सामना जिंकणं तसं अवघड आहे. 

त्यात यंदाच्या वर्षभरात सलग पाच एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह देखील उंचावला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच इंदूरच्या होळकर स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर भारताने आजवर एकही सामना या ठिकाणी गमावलेला नाही. तर इंदूरमधील या सामन्यापूर्वी भारताच्या याठिकाणच्या काही मोठ्या वनडे रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ… 

  1. सर्वोच्च धावसंख्या – भारत 418/5 वि. वेस्ट इंडीज
  2. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या – वीरेंद्र सेहवाग, वि. वेस्ट इंडिज 
  3. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी – एस श्रीशांत, 6 विकेट्स वि. इंग्लंड 

भारत इंदूरच्या मैदानात अजय

इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारताचाच दबदबा आजवर राहिला आहे. वनडेमध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला आहे. भारताने इंदूरमध्ये 5 पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजयाची नोंद केली आहे. इंदूर येथे पहिला एकदिवसीय सामना 15 एप्रिल 2006 रोजी खेळला गेला. त्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. त्यानंतर पुढील चार सामन्यांत सलग विजय नोंदवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत इंग्लंडला दोनदा तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी एकदा पराभूत केलं आहे. न्यूझीलंडचा संघ इंदूरमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.

हे देखील वाचा-

news reels New Reels

Source link

हेही वाचा :  ऋतुराजचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहास कोणालाच नाही जमलं, ते त्यानं करून दाखवलं!

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …