सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दराने मोठी उसळी मारल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर सोनं दोन हजारापर्यंत स्वस्तदेखील झाले होते. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 72,710 इतका आहे. तर, चांदीच्या दरात 1300 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

अमेरिकन फेडरल रिझव्र्ह बँकेने व्याजदर कपातीची आशा धुळीस मिळवल्याने सोन्याची झळाळीही फिकी पडत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली होती. मात्र, गेल्या साडेपाच महिन्यात सर्वाधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात 3 टक्के घट झाली होती. गेल्या आठवड्यात कॉमेक्सवर सोनं 2,449 डॉलरवर पोहोचले होते. परंतु, आतापर्यंत सोन्याचा दरात 100 डॉलरने घसरण झाली आहे. 

मे महिन्यानंतर लग्नसराईचा मोसम कधी होताना दिसतो. तसंच, त्यामुळं भारतात आता सोन्याची मागणीदेखील आता कमी होताना दिसणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 72,710 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 66,650 रुपये इतका आहे. 

हेही वाचा :  Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 650 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 710  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54,530 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,665 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,271 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,453 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   53,320 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,168 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,624  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66, 650 रुपये
24 कॅरेट-  72, 710  रुपये
18 कॅरेट-  54, 530 रुपये

हेही वाचा :  Gold Silver Rate : सोने झाले स्वस्त, चांदी चकाकली; पाहा आजचे दरSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …