ICC टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार म्हणून बटलरचं नाव, सर्वाधिक भारतीय खेळाडूंना स्थान

ICC Mens T20I Team of the Year 2022 : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. ज्यानंतर आता आयसीसी पुरस्कारही जाहीर होत असून आयसीसीने नुकतीच आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर (ICC Mens T20I Team of the Year 2022) जाहीर केली, ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर (Jos Buttler) याला सोपवण्यात आलं आहे. तर भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा (Hardik Pandya) यालाही स्थान देण्यात आलं आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय खेळाडू सर्वाधिक आहेत. याशिवाय इंग्लंडचा सॅम करन (sam curran), झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (sikandar raza), पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan), हॅरीस रौफ (Haris Rauf) या खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. तर संपूर्ण संघ कसा आहे पाहूया…

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात- हार्दिक पांड्या

आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर-

    • जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर)
    • मोहम्मद रिझवान
    • विराट कोहली
    • सूर्यकुमार यादव
    • ग्लेन फिलिप्स
    • सिकंदर रझा
    • हार्दिक पांड्या
    • सॅम करन
    • वानिंदू हसरंगा
    • हॅरीस रौफ
    • जोश लिटिल


तर या संघाचा विचार करता भारताचे तीन, पाकिस्तानचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचं नाव ICC च्या सर्वोत्तम T20 संघात आहे. विशेष म्हणजे, यंदा आयसीसीनं 2022 च्या सर्वोत्कृष्ट T20 आंतरराष्ट्रीय संघात स्टार संघाशिवाय आयर्लंड आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे.  याचं कारण या दोघांनी 2022 वर्षात टी20 फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. याच कारणामुळे दोन्ही खेळाडूंना आयपीएल लिलावातही विकत घेण्यात आले होते. हे दोन खेळाडू म्हणजे सिकंदर रझा आणि जोश लिटल असून रझा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, तर लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.

news reels New Reels

हे देखील वाचा- 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …