Rakhi Sawant : राखी सावंतची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतने  (Rakhi Sawant) अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला राखीनं हायकोर्टात आव्हान  दिले आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra) तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.

नेमकं प्रकरण काय? 

शर्लिन चोप्राने राखी सावंतवर (Rakhi Sawant) आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर पुन्हा एकदा तिला ताब्यात घेण्यात आलं. 

राखी सावंत कायम चर्चेत!

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखी नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात दिसली होती. ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वापासून राखीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे तिला ‘बिग बॉसची बायको’ असं म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 


वैयक्तिक आयुष्यामुळे राखी चर्चेत

राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नासंदर्भातली माहिती चाहत्यांना दिली होती. राखीचा पती आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहतो. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेले काही दिवस राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. 

हेही वाचा :   Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग 

संबंधित बातम्या

Rakhi Sawant: सहा तासाच्या चौकशीनंतर राखी सावंतची आंबोली पोलिस ठाण्यातून सुटका- काय आहे प्रकरण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …