‘तू आई आणि बायको होण्याच्या लायकीची नाही’; चाहत आणि उर्फीमध्ये पुन्हा ‘WAR’

मुंबई, 19 सप्टेंबर : उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. उर्फीचं नाव ऐकू आलं तरी डोळ्यासमोर तिची अतरंगी फॅशन आल्याशिवाय राहत नाही. आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करणारी उर्फी सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि अभिनेत्री चाहत खन्नामध्ये कॅट फाईट सुरु आहे. दोघेही एकमेकींना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच चाहतने आता उर्फीची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. तिनं सोशल मीडियावर स्टोरी ठेवत उर्फीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चाहतचे नाव समोर येताच उर्फीने चाहतची खिल्ली उडवली होती. यानंतर चाहते रागात उर्फीला दिदी म्हटले तर उर्फीनेही चाहतला आंटी म्हटलं. आता चाहतने सोशल मीडियावर स्टोरी ठेवत उर्फीविषयी वादग्रस्त स्टेटमेंट केलं आहे. याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

चाहतने स्टोरी ठेवत म्हटलं की, ‘खरं काय ते माहिती नसताना पब्लिसीटीसाठी मधे पडणे हा मुर्खपणा आहे. ब्रेनलेस लोकांशी काय वाद करायचा. डोकं असतं तर सेमी न्यूड स्पॉटींग केली नसती. स्वत:ची तर कोणाची आई, बायको, आंटी बनण्याची लायकी नाही त्यामुळे इतरांना आंटी म्हणण्यात आनंदी राहा’. चाहतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे. दोघींमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचंही दिसून येतंय.

हेही वाचा –  ‘मी तुझ्यावर बलात्कार केलाय का?’; पापाराझींसोबत बोलताना Urfi Javed ची जीभ घसरली

दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

प्रियांका चोप्राची लेक मालतीसोबत फर्स्ट ट्रीप; ‘या’देशात घेतेय सुट्टीचा आनंद

मुंबई, 21 सप्टेंबर-  बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. …

‘मला तुमचं ऐकायचं आहे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मराठी कलाकारांची बैठक

मुंबई, 21 सप्टेंबर–  “मला तुमचं ऐकायचं आहे” असं म्हणत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी …