डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ग्रंथपाल ते प्राचार्यपर्यंत विविध पदांची भरती

Deccan Education Society Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राचार्य, ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे, या विविध पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्राचार्य आणि लायब्ररीयनचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. इंग्रजी, बिझनेस मॅनेजमेंट, नॉन लॉ सब्जेक्ट, इकोनॉमिक्स आणि सोशलॉजी या प्रत्येक विषयासाठी असिस्टंट प्रोफेसरचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीए एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे.

असिस्टंट प्रोफेसर- (लॉ अंडर ग्रॅज्युएट) च्या एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीए एलएलबी, बीबीए एलएलबी आणि पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. तर असिस्टंट प्रोफेसर- (पोस्ट ग्रॅज्युएट) ची ३ पदे भरली जाणार आहेत.

आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

३० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज डीईएसचे श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करताना खुल्या प्रवर्गाकडून २०० रुपये तर राखीव प्रवर्गाकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
Collector Office Job: जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षा न देता नोकरी, ४५ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …