आर्चर सलग दुसऱ्या टी20 विश्वचषकातून बाहेर
जोफ्रा आर्चरनं 2019 च्या वन डे विश्वचषकात इंग्लंडच्या विजयात मोठं योगदान दिलं होतं. अखेरची निर्णायक सुपर ओव्हर आर्चरनंच टाकली होती. आणि त्याच ओव्हरमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडच्या ताटातला विजयाचा घास हिरावून घेतला होता. आणि पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ विश्वविजेता झाला. पण त्यानंतर मात्र दुखापतीनं आर्चरची पाठ पकडली.
आर्चरनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2021 मध्ये खेळला होता. तेव्हापासून गेले दीड वर्ष तो एल्बो इन्ज्युरीमुळे (कोपराला झालेली दुखापत) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. यादरम्यान त्याच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. पण अजूनही तो पुरेसा फिट नसल्यानं इंग्लंडनं त्याला आगामी विश्वचषकासाठी संघात स्थान दिलं नाही. त्यामुळे यूएईतल्या वर्ल्ड कपनंतर आर्चर आता ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कपलादेखील मुकणार आहे. आर्चरसह जेसन रॉय देखील विश्वचषक संघातून दुखापतीमुळे आऊट झालाय.
Squad 🙌 #T20WorldCup 🏏 🌏 🏆 pic.twitter.com/k539Gzd5Ka
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
हेही वाचा – Asia Cup 2022: सुट्टीच्या दिवशी रोहित अँड कंपनीची दुबईत मजा मस्ती, बीसीसीआयनं शेअर केला Video
इंग्लंडचा टी20 विश्वचषक संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या