मोहालीत पावसाचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज संध्याकाळी मोहालीच्या आकाशात ढग दाटून येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. पण हा पाऊस तुरळक स्वरुपाचा असेल. पण त्यामुळे सामन्यावर थोडा अधिक परिणाम होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – Cricket: धक्कादायक… SA T20 लीग लिलावात दक्षिण आफ्रिकेचे कसोटी आणि वन डे कॅप्टन ठरले अनसोल्ड
टॉस जिंकणं महत्वाचं
पावसाच्या अंदाजामुळे दोन्ही संघांसाठी नाणेफेकीचा कौल तितकाच महत्वाचा ठरणार आहे. पाऊस आणि दवामुळे टॉस जिंकणारा संघ पहिल्यांजा फिल्डिंग करणं पसंत करेल. भारतानं या ग्राऊंडवर आधी खेळलेल्या तिन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करुन विजय मिळवला आहे.
Preps ✅#TeamIndia set for the 1⃣st #INDvAUS T20I! 👍 👍 pic.twitter.com/R07qPSsNlO
— BCCI (@BCCI) September 20, 2022
मोहालीत पाचवी आंतरराष्ट्रीय टी20
दरम्यान मोहालीत आज खेळवण्यात येणारा सामना हा या मैदानावरचा आतापर्यंतचा पाचवा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असेल. तर भारत तिसऱ्यांदा इथे टी20 सामना खेळणार आहे. 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमधले तीन सामने इथे खेळवण्यात आले होते.
भारत वि. ऑस्ट्रेलिया, टी20 सामना
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्क आणि हॉटस्टारवर
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियन संघ- अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झॅम्पा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या