दीपाची बाजू घेणाऱ्या कार्तिकला प्रेक्षकांनी करून दिली जुन्या पापांची आठवण

मुंबई,  20 सप्टेंबर: स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही अनेक महिन्यांपासून टॉप वन मालिका आहे. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत.  सध्या मालिकेत फार गंभीर वळण पाहायला मिळत आहे. दीपा कार्तिकीची आई असल्याचं सत्य समोर आल्यानंतर आता कार्तिकीच्या कस्टडीसाठी दीपा आणि कार्तिक यांची लढत सुरू आहे. मालिकेत सध्या कोर्ट ड्रामा पाहायला मिळतोय. तिथेही आयेशा तिला हवं तसं नाट्य वकिलांकडून करवून घेत आहे. पण या सगळ्यात पुन्हा एकदा दीपा आणि कार्तिक एकत्र येताना दिसणार आहे. भर कोर्टात वकिलांनी दीपावर केलेल्या आरोपांवर कार्तिक चांगलाच चिडला आहे.

रंग माझा वेगळा मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात कार्तिकचा वकिल दीपाच्या चरित्र्यावर संशय घेतो.  ‘पैशासाठी मी कुठेही काम करेन असं म्हणणारी बाई आदर्श बाई कशी होऊ शकते. अशा वाईट चालीच्या बाईकडे मुलीची कस्टडी देऊ नये’, असं वकिल म्हणतात. दीपावर होत असलेलं आरोप पाहून कार्तिकचं प्रेम मात्र जाग झालं आहे. दीपावर तुम्ही असे आरोप कसे करू शकत असं म्हणत तो वकिलांना मारायला जातो.  ‘केस जिंकण्यासाठी एका स्त्रियाच्या अब्रूचे धिंदवडे काढताना लाज नाही वाटली तुम्हाला’, असं कार्तिक वकिलांना ठणकावून विचारतो. कार्तिकच्या या वक्तव्यानंतर सगळेच शॉक होतात.

हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte : ‘अनिरुद्ध वेडा झालाय’ ; लेटेस्ट एपिसोड पाहून प्रेक्षकांना कमेंट आवरेना

कार्तिक केस जे वकिल लढवत होते त्याच वकिलांवर कार्तिकनं हात उचल्यानं आता वकिल त्यांचा निर्णय बदलून आयेशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? त्याचप्रमाणे दीपाची बाजू घेणाऱ्या कार्तिकच्या मनात दीपाविषयी आदर आहे तर समोर आलं आहे मात्र तो आता दीपावरील प्रेम व्यक्त करणार का?असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. ज्याची उत्तर मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.

कार्तिकला जरी त्याच्या जुन्या प्रेमाची आठवण येऊन त्यानं दीपाची बाजू घेतली असली तरी प्रेक्षकांच्या मात्र हे काही पचनी पडलेलं दिसून येत नाही. दीपाची बाजू घेणाऱ्या कार्तिकला मात्र प्रेक्षकांनी त्याच्या जुन्या पापांची आठवण करून दिली आहे. एका युझरनं म्हटलंय, ‘अरे बापरे, कार्तिकनं तर कोणते आरोप केले होते दीपावर यापूर्वी ते विसरला वाटत’. सध्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर  चर्चा होतान दिसतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …