शशांकनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ त्यानं मालाड परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था दाखण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण बाजूला ठेवून साध्या साध्या गोष्टींकडं राजकारण्यांनी ज्यांना जनतेनं निवडून दिलं आहे, त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं शशांक म्हणतोय. रहदारीच्या ,महत्त्वांच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानं विचारला आहे. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणाऱ्याच्या महागड्या गाड्या खराब होत आहेत, नागरिंकाना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय, असं शशांकनं म्हटलंय.
शशांकनं एक पोस्टही शेअर केली आहे. महत्त्वाचे पाच मुद्दे त्यानं या पोस्टमध्ये मांडले आहेत.
मुद्दा क्र. १- तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या.
मुद्दा क्र. २ – हा व्हिडिओ मुळात कोणाच्या तरी सपोर्टसाठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या रस्त्यांबद्दल माझं म्हणण आहे.
वाचा त्याची संपूर्ण पोस्ट?
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या