बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा आणि ठराव-
राज्याचे मुख्यमंत्री आणि सिनेसृष्टीतील कलाकार यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. यावेळी अनेक विषयांवर सखोल चर्चा करून त्याबाबतीत निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मराठी चित्रपटांना जीएसटीतून सूट देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नव्हे तर ज्येष्ठ मराठी कलाकारांना मानधन योजनासुद्धा सुरु करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या चित्रनगरीतील रस्ते, प्रवासी वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा,सुरक्षा आणि स्वछता अशा अनेक बाबी तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकरांना सेटवर राबणाऱ्या तंत्रज्ञांना,वादकांना विमा संरक्षण याबाबतही लवकरच निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याचं आश्वासनही या बैठकीत देण्यात आलं आहे. दरम्यान चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत लवकरच नवे बदल दिसून येतील याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(हे वाचा:Milind Gawali : ‘आयुष्याचं गणित चुकलं आहे का?’; निर्सगात रमलेले मिलिंद गवळी असं का म्हणाले? )
प्रसाद ओक इंस्टाग्राम पोस्ट-
“मला तुमचं ऐकायचं आहे”असं म्हणत काल मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे यांनी नाटक,मालिका, आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातल्या अनेक लोकांशी वार्तालाप केला. अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले गेले. आमच्या अनेक अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. शासकीय पातळीवर संपूर्ण मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद खूपच महत्वाचा ठरेल अशी आशा वाटते. इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमचं ऐकल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनःपूर्वक आभार.या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आमचे मित्र सचिन जोशी, विजू माने, आणि मंगेश देसाई यांचेही खूप आभार…!!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या