‘धर्मवीर’ सिनेमा आणि त्यानंतरचं सत्तांतर, पाहा काय म्हणाला प्रसाद ओक

मुंबई, 8 ऑगस्ट: देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून सगळेच आनंदी आहेत. दोन वर्षाच्या कालावधीनंतर बाप्पाचं आगमन थाटामाटात झालं आहे. अशातच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता प्रसाद ओकने न्यूज18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात हजेरी लावली. फक्त हजेरी लावली नाही तर यावेळी त्यानं प्रेक्षकांसोबत दिलखुलास गप्पा देखील मारल्या.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रंचंड गाजला. अद्यापही या चित्रपटाची चर्चा होत असलेली पहायला मिळते. अशातच न्यूज18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात प्रसादला धर्मवीर चित्रपट, आनंद दिघेंवर प्रकाशित होणारे पुस्तक आणि महाराष्ट्रात झालेले सत्तांतर याविषयी प्रश्न विचारण्यात आला. याच्या उत्तरार्थ प्रसाद ओक म्हणाला, ‘ खरोखर अगदी प्रामाणिकपणे एक सच्चा कलाकार म्हणून सांगायचं तर मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही’.हा सत्तापालट होणार होता की नाही? तो धर्मवीरमुळे झाला की नाही? असं अनेक लोक म्हणतात. पण मला माहिती नाही’.

प्रसाद पुढे म्हणाला की, ‘मी तो एक चित्रपट म्हणून स्विकारला. एकतर अशी कलाकृती वारंवार करायला मिळत नाही. धर्मवीर सारखे चित्रपट 10 ते 15 वर्षे बनत नाहीत.अशी भूमिका सतत वाट्याला येत नाही. जर समोरुन माझ्याकडे आनंद दिघेंची भूमिका येते तर ती जीव तोडून, जीवापाड प्रयत्न करुन ती करणे, त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, त्यांच्याकडून तितकंच प्रेम मिळायला हवं’.

हेही वाचा –  Prasad Oak Exclusive : धर्मवीर नंतर ‘या’ प्रतिभावान कलाकारावर प्रसाद काढणार सिनेमा; समोर आल्या डिटेल्स

‘लोकांचं दिघे साहेबांवर जितकं प्रेम आहे, ते त्यांना दैवत मानतात. त्यांच्या त्या भावनेला कुठे ठेच लागता कामा नये. त्यांच्या भावनांचा आदरच राखला गेला पाहिजे आपल्याला. मात्र सत्ताबदल आणि सत्तानंतर त्याच्यामुळे झालं नाही झालं,याबद्दल बोलणं हा माझा प्रांत नाही. मी त्याकडे कधीही त्या दृष्टीने पाहिलं नाही. असं काही होईल याची आम्हाला एक टक्काही कुठेही जाणीव नव्हती’, असंही प्रसाद ओकनं म्हटलं.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

वादग्रस्त ट्विट प्रकरणात KRK ला जामीन मंजूर; आज होणार सुटका

मुंबई,8  सप्टेंबर-  चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खान (KRK) याला बुधवारी एका वादग्रस्त ट्विट …

आदेश बांदेकरांनी केलं बाप्पाचं आगळंवेगळं विसर्जन; व्हिडीओ पाहून सर्वच थक्क

मुंबई, ०9 सप्टेंबर : आजकाल गणेशोत्सव आपण अतिशय उत्साहात साजरा करतो. दहा दिवस गणरायाचा जल्लोष …