वैभव तत्त्ववादीनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ एक BTS व्हिडीओ असून त्याच्या आगामी चित्रपटाचा शेवटचा डबिंग सीन आहे. वैभवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचंही पहायला मिळतंय.
हेही वाचा – ‘सुख म्हणजे काय असतं’ फेम शालिनीचं साडीत खुललं सौंदर्य, पाहा माधवी निमकरचा मनमोहक अंदाज
वैभव हा सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त होत असतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन तो भाष्य करताना दिसतो. मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा चाहतावर्ग मोठा आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना आपण त्याला पाहिलं आहे. त्याच्या अभिनयानं तो नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असतो.
दरम्यान, अभिनयाव्यतिरीक्त तो फिटनेस फ्रीकही आहे. तो फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या जबरदस्त पिळदार बॉडिविषयी अनेकजण नेहमीच विचारत असतात. तोही सोशल मीडियावर चाहत्यांना याविषयी सांगतो.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या