कमाल आर खानची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. केआरकेचं ट्विट जातीयवादी असून त्याने बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तथापि, केआरकेचे वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांनी जामीन अर्जात असं नमुद केलं होतं की, त्या ट्विटमध्ये फक्त “लक्ष्मी बॉम्ब” नावाच्या चित्रपटावर टिप्पणी केली गेली होती (जो फक्त ‘लक्ष्मी’ म्हणून प्रदर्शित झाला) आणि पोलिसांनी आरोप केलेला असा कोणताही गुन्हा नाहीय.
केआरके चित्रपटसृष्टीत समीक्षक किंवा रिपोर्टर म्हणून काम करत असल्याचेही जामीन अर्जात म्हटलं आहे. KRK वर 2020 मध्ये IPC च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये 153 (दंगल भडकवण्याच्या हेतूने प्रवृत्त करणे) आणि 500 (बदनामीसाठी शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींचा समावेश आहे.
(हे वाचा:Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला… )
कमाल आर खान हा सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांविरोधोत सिनेमांविरोधात तो कायम वादग्रस्त ट्विट करत असतो. सिनेमांचे रिव्ह्यू देत असतो. त्याची विधान नेहमीच वादात आली आहेत. अनेकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील आला आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या नावावरुन खान आडनाव हटवून कुमार असं ठेवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या