‘मी तुझा बलात्कार केलाय का?’; पापाराझींसोबत बोलताना Urfi Javed ची जीभ घसरली

मुंबई, 16 सप्टेंबर : उर्फी जावेद एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये ही ती झळकली आहे. परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. अशातच उर्फी पुन्हा एकदा बोल्ड लुकमध्ये पहायला मिळाली. यावेळी ती ‘मिडल क्लास लव्ह’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहचली. यावेळी ती तिच्या बोल्ड कपड्यांपेक्षा बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

‘मिडल क्लास लव्ह’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहचलेल्या उर्फीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये उर्फी पापाराझींना ओरडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये उर्फी बोलताना दिसतेय की, ज्या कोणाला माझ्यासोबत फोटो काढायचाय तो पुढे येईल. त्यानंतर फोटोग्राफर लाजत उर्फीसोबत फोटो काढायला समोर येतो. फोटो काढल्यावर उर्फी बोलते तू का लाजत आहे?. मी तुझा बलात्कार केलाय का?, मी काय केलंय का?. तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

उर्फीच्या पाठोपाठ वॉशरुमच्या बाहेरही पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी पोहचले. यावेळी उर्फी त्यांना म्हणते की, आता काय वॉशरुममध्ये येता का?. याशिवाय उर्फीचा पॉपकॉर्न ऑफर करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये उर्फी पापाराझींना पॉपकॉर्न ऑफर करताना दिसत आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहचलेल्या उर्फीचे सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

हेही वाचा –  Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली ‘माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर…’

दरम्यान, उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. तिचं नाव येताच पहिली तिची अतरंगी फॅशन डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. दररोज नवनवीन आणि अतरंगी कपड्यांमध्ये उर्फी पहायला मिळते. प्रत्येक वेळी नव्या लुकमध्ये येऊन ती नेटकऱ्यांना हैराण करत असते. आजकाल उर्फी तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत असते.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …