या व्हिडिओमध्ये अरुंधती गणपतीची मूर्ती रंगवताना दिसतेय. अरुंधती मनोभावे गणरायाची भूमिका साकारत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला यश आजीआजोबांना सांगतोय कि, ‘या वर्षी आईच्या घरी गणपती आणणार आहोत.’ त्याला अप्पा पाठींबा दर्शवतात. पण कांचन म्हणते, ‘आधीच तिची प्रकृती नाजुक. आता हे कशाला? त्यावर यश म्हणतो, आम्ही आहोत ना सगळे. आम्ही करू सगळं.’ त्यामुळे एकूणच आता थोडे दिवस मालिकेत प्रसन्न वातावरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
याआधी नवा गाडी नवे राज्य मालिकेत अनादी स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारताना दिसली होती. त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता अरुंधतीने साकारलेली मूर्ती पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेही वाचा – Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली ‘माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर…’
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या आशुतोषचा पुतण्या अनिशची एंट्री झाली आहे. आता इशा आणि अनिशमध्ये जवळीक निर्माण होत आहे. त्यामुळे मालिकेला नवीन वळण लागेल तसेच गणेशोत्सवानिमित्त आशुतोष आणि अरुंधती जवळ येणार का? हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान मालिकेत सध्या अनिरुद्ध विरुद्ध यश असा संघर्ष पाहायला मिळत आहे. इशा आणि अनिशमधील मैत्री अनिरुद्धला काही पटत नाहीये. त्यामुळे आता अनिरुद्धच्या ईशाला अनीशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या